Bank of Baroda Recruitment 2021: सरकारी नोकरी करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी एक खुशखबर आहे. कारण बँक ऑफ बड़ौदा मध्ये नोकर भरती संदर्भात जाहीरात झळकवण्यात आली आहे. त्यानुसार बँकेत 511 मॅनेजर पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे. तर सीनियर रिलेशनशिप मॅनेजर, ई-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर, टेरीटरी हेड, ग्रुप हेड, प्रोडक्ट, डिजिटल सेल्स मॅनेजर आणि आयटी फंक्शनल अॅनालिस्ट मॅनेजरच्या पदावर नोकर भरती केली जाणार आहे. त्यामुळे या नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी bankofbaroda.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा.
नोकरभरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 9 एप्रिल पासून सुरु झाली असून अंतिम तारीख 29 एप्रिल 2021 दिली गेली आहे. त्यामुळे अर्ज करण्याचा तारीख संपण्यापूर्व तो ऑनलाईन पद्धतीने भरा. मात्र नोकर संदर्भात दिलेल्या अटी आणि नियम सुद्धा एका वाचून पहा. तर जाणून घ्या नोकर भरतीच्या पदांबद्दल अधिक:-(ISRO Recruitment 2021: इस्रो मध्ये 'या' पदांसाठी नोकर भरती, येत्या 21 एप्रिल पर्यंत उमेदवारांना करता येणार अर्ज)
>>सिनियर रिलेशनशिप मॅनेजर- 407 पद
>> ई-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर- 50 पद
>>टेरीटरी हेड- 44 पद
>>ग्रुप हेड- 6 पद
>>प्रोडक्ट हेड (इन्वेस्टमेंट अॅन्ड रिसर्च)- 1 पद
>>हेड (ऑपरेशंन्स अॅन्ड टेक्नॉलॉजीः- 1 पद
>>डिजिटल सेल्स मॅनेजर-1 पद
>>आयटी फंक्शनल अॅनालिस्ट मॅनेजर-1 पद
अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. तर संपूर्ण अटी आणि नियमांची पूर्तता करावी. त्याचसोबत अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 600 रुपये शुल्क भरावा लागणार आहे. तर महिलांना अर्ज करण्यासाठी 100 रुपये द्यावे लागणार आहेत.