ISRO Recruitment 2021: इस्रो मध्ये 'या' पदांसाठी नोकर भरती, येत्या 21 एप्रिल पर्यंत उमेदवारांना करता येणार अर्ज
ISRO (Image: PTI)

ISRO Recruitment 2021: इस्रो मध्ये नोकरीची इच्छा असलेल्या व्यक्तींसाठी एक खुशखबर आहे. कारण इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गेनाइजेशन कडून अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर. अकाउंट्स ऑफिसरसह अन्य पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या अंतर्गत एकूण 24 रिक्त पदांवर नियुक्ती होणार आहे. अशातच इच्छुक असलेल्या उमेदवारांना येत्या 21 एप्रिल 2021 किंवा त्याआधील ऑनलाईन पद्धतीने अर्ज करु शकतात.(Sarkari Naukari 2021: महाराष्ट्रासह 'या' 17 राज्यांमध्ये शिक्षक पदांसाठी नोकर भरती, जाणून घ्या अर्जप्रक्रिया)

ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवाती तारीख 1 एप्रिल 2021 असून अंतिम तारीख 31 एप्रिल दिली गेली आहे. त्याचसोबत ऑनलाईन अर्जाचे शुल्क 23 एप्रिल 2021 पर्यंत करता येणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी त्या संबंधित नियम आणि अटींबद्दल प्रथम वाचून घ्या. तर या नोकर भरती संदर्भात अधिक माहिती येथे जाणून घ्या. (ISRO Recruitment 2021: 10 वी, 12 वी पास तसेच डिप्लोमा उमेदवारांसाठी इस्रोमध्ये नोकरभरती; जाणून घ्या कुठे कराल अर्ज, वयोमर्यादा व पात्रता)

>>अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर- 6 पद

>>अकाउंट्स ऑफिसर- 6 पद

>>पर्चेज अॅन्ड स्टोर्स ऑफिसर-12 पद

तर अॅडमिनिस्ट्रेटिव्ह पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी एमबीएसह सुपरवाइजरच्या पदासंदर्भात 1 वर्षाचा अनुभव किंवा पोस्ट ग्रॅज्युएटसह 3 वर्षांचा अनुभव किंवा 5 वर्षांचा अनुभव सुद्धा असणे आवश्यक आहे.

अकाउंट्स ऑफिसर पदासाठी ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून एसीए/एफसीए किंवा एआयसीडब्लूए? एमबीए करुन एमकॉम मध्ये 1 वर्षांचा अनुभव असावा. या व्यतिरिक्त B.com/BBA/BBM मध्ये सुद्धा शिक्षण घेतलेले असावे.

पर्चेस अॅन्ड ऑफिसर पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून मॅटेरियल मॅनेजमेंट मध्ये एमबीएची डिग्री आणि सुपरवाइजर मध्ये एका वर्षाचा अनुभव असावा किंवा मॅटेरियल मॅनेजमेंट मध्ये युजी आणि पीजी मध्ये डिग्री घेतलेली असावी.

इस्रोकडून निघालेल्या विविध पदांच्या नोकर भरतीसाठी अधिकृत वेबसाइट www.isro.gov.in वर अर्ज करता येणार आहे. त्यामुळे अर्ज भरताना तो काळजीपूर्वी भरावा असे उमेदवारांना स्पष्ट करण्यात आले आहे.