WBPSC Assistant Professor Recruitment 2019: सरकारी नोकरी मिळाली की अचानक जॉब गमवण्याचा धोका नसतो सोबतच उत्तम पगार आणि मासिक भत्ते असतात त्यामुळे आजही तरूणाईचा ओढा सरकारी नोकरीकडे अधिक आहे. मग जर तुम्ही देखील महाराष्ट्र सोडून देशात इतरत्र राहून नोकरी करण्याच्या तयारीत असाल तर पश्चिम बंगाल पब्लिक सर्व्हिस कमिशन (WBPSC) मध्ये तुम्हांला कामाची संधी आहे. Assistant Professor या पदासाठी 167 जणांची भरती होणार असून 19 डिसेंबर पूर्वी यासाठी अर्ज दाखल करणं आवश्यक आहे. Sarkari Naukri- CISF Recruitment 2019: सीआयएसएफ हेड कॉन्स्टेबलसाठी 300 पदांची नोकर भरती; अर्ज करण्यासाठी येथे पाहा.
WBPSC Recruitment महत्त्वाच्या तारखा
WBPSC Recruitment साठी ऑनलाईन माध्यमातून अर्ज दाखल करणं आवश्यक आहे.
ऑनलाईन अर्ज सुरूवात: 29 नोव्हेंबर
शेवटची तारीख: 19 डिसेंबर
अॅप्लिकेशन फी भरण्याची शेवटची तारीख: 19 डिसेंबर
UBI ब्रांच मध्ये ऑफलाईन माध्यमातून फी भरण्याची तारीख: 20 डिसेंबर 2019
अधिकृत वेबसाईट: www.pscwbonline.gov.in/apps/home/
नोकरीचं ठिकाण: पश्चिम बंगाल (कोलकत्ता)
कोणत्या 167 जागांसाठी होणार भरती?
बंगाली – 8 जागा
बॉटनी- 12 जागा
केमेस्ट्री – 4 जागा
वाणिज्य – 4 जागा
कॉम्प्युटर सायंस – 4 जागा
अर्थशास्त्र – 1 जागा
शिक्षण – 3 जागा
इंग्रजी– 12 जागा
भूगोल – 4 जागा
इतिहास – 10 जागा
गणित – 9 जागा
मायक्रोलॉजी – 5 जागा
न्युट्रीशन – 3 जागा
पर्शियन – 1 जागा
फिलोसॉफ़ी – 2 जागा
फिजिक्स – 9 जागा
फिजिओलॉजी– 3 जागा
राज्यशास्त्र – 10 जागा
मानसशास्त्र – 1 जागा
संस्कृत – 3 जागा
संताली- 1 जागा
समाजशास्त्र– 2 जागा
स्टॅटस्टिक – 3 जागा
तिबेटियन – 1 जागा
उर्दू – 1 जागा
झूऑलॉजी – 8 जागा
शैक्षणिक पात्रता:
इच्छुक उमेदवार हा किमान पोस्ट ग्रॅज्युएट असणं आवश्यक आहे. NET परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. अधिकृत वेबसाईटवर तुम्हांला ऑफिशिएअल नोटिफिकेशन पाहता येणार आहे.
वयोमर्यादा:
असिस्टंट प्रोफेसर साठी इच्छुक उमेदवाराचं कमाल वय 40 वर्ष असणं आवश्यक आहे. तर जातीय आरक्षणानुसार संबंधितांना वयोमर्यादेमध्ये मुभा मिळू शकते.
उच्छुक उमेदवारांना WBPSC Assistant Professor Recruitment 2019 मध्ये ऑनलाईन माध्यमातून अर्ज करणं बंधनकारक आहे. त्यासाठी संकेतस्थळावर अधिक माहिती त्यासाठी ऑफिशिएअल नोटिफिकेशन देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी तुम्हांला वेळोवेळी वेबसाईट पाहणं आवश्यक आहे.