Sarkari Naukri- CISF Recruitment 2019: सीआयएसएफ हेड कॉन्स्टेबलसाठी 300 पदांची नोकर भरती; अर्ज करण्यासाठी येथे पाहा
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit: PTI)

सेंट्रल इंडस्ट्रीयल सेक्युरीटी फोर्स (Central Industrial Security Force) हा भारतातील केंद्रीय सशस्त्र दलांचा एक भाग आहे. यासाठी स्पोर्ट्सच्या कोट्यातून सीआयएसएफ हेड कॉन्स्टेबलसाठी 300 पदांची नोकर भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. सीआयएसएफ नियमितपणे भारतीय नागरिकांना सीआयएसएफचा भाग म्हणून काम करण्यासाठी स्पोर्टच्या कोट्यातून भरतीची संधी उपलब्ध करुन दिली. सीआयएसएफसोबत काम करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी उत्तम संधी प्राप्त झाली आहे. यासाठी इच्छुकाला अर्ज करण्यासाठी सीआयएसएफच्या अधिकृत वेबसाईवर भेट द्यावी लागणार आहे. अर्ज केल्यानंतर पात्र अर्जदारालाच नोकरीची संधी देण्यात येणार आहे.

आपत्ती व्यवस्थापनामध्ये त्यांची एक महत्त्वपूर्ण भूमिका पाहायला मिळते. यासाठी सीआयएसएफच्या ताफ्यात जाण्यापूर्वी पात्र उमेदवाराला प्रशिक्षित केले जाते. तसेच सीआयएसएफकडे विविध सरकारी सुविधा आणि भारतातील वेगवेगळ्या भागातील प्रकल्पांना सुरक्षा पुरविण्याची जबाबदारीही सोपविण्यात आली आहे. अलिकडेच सीआयएसएफने क्रिडा कोट्यातून विविध उमेदवारांची भरती प्रकिया सुरु केली आहे. ज्या उमेदवारांनी एखाद्या खेळात उत्कृष्ट कामगिरी बजावली असेल किंवा राष्ट्रीय पातळीवर खेळला असेल, अशा उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. त्यांना पॅरामिलिट्री पदावर नोकरी मिळण्याची शक्यता आहे.

स्पोर्ट्स कोट्यातून मिळणाऱ्या जागा खालील प्रमाणे-

ऍथेलिटिक्स- 44 पुरुष, 47 महिला

बॉक्सिंग- 4 पुरुष, 7 महिला

बास्केटबॉल- 8 पुरुष

फूटबॉल- 6 पुरुष

हॉकी- 12 पुरुष

जूडो- 10 पुरुष, 7 महिला

कबड्डी- 8 पुरुष, 12 महिला

नेमबाजी- 23 पुरुष, 9 महिला

स्विमिंग- 14 पुरुष

व्हॉलीबॉल- 8 पुरुष

व्हेट लिफ्टिंग- 7 पुरुष 9 महिला

कुस्ती- 20 पुरुष

टायकांडो- 16 पुरुष

अटी-

-उमेदवारांची किमान शैक्षणिक पात्रता 12 वी पास केलेली असावी.

- अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 18 ते 23 वर्षे असणे गरजेचे आहे.

- उमेदवाराचे राष्ट्रीय किंवा राज्य स्तरावर प्रतिनिधित्व केले पाहिजे

अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अर्ज व पोस्टल ऑर्डर / डिमांड ड्राफ्ट, त्यांची कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे, वेगवेगळ्या खेळांनुसार अधिसूचनेनुसार नमूद केलेल्या पत्त्यावर द्याव्या लागतील. उमेदवाराकडून अर्ज करण्यासाठी 100 रुपये शुल्क आकरले जाणार आहे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील लोकांना अर्ज शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. हे देखील वाचा- Sarkari Naukri: SSC 2019-20 मध्ये 1 लाखापेक्षा अधिक नोकर भरती

निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे-

1) चाचणी परीक्षा

2) अंतिम परिक्षा

3) वैद्यकीय चाचणी

सीआयएसएफ हेड कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 17 डिसेंबर 2019 आहे. पूर्वोत्तर विभागातील अर्जदार 24 डिसेंबर 2019 पर्यंत अर्ज सादर करू शकतात.