प्रतिकात्मक फोटो (File Photo)

LokSabha Parliamentary Reporter Recruitment 2020:  सराकारी नोकरीच्या शोधात असणार्‍यांसाठी एक मोठी बातमी आहे. संसदेकडून जारी करण्यात आलेल्या नोटिफिकेशनमध्ये लोकसभेमध्ये 'पार्लमेंटरी रिपोर्टर' (Parliamentary Reporter) या पदासाठी 21 जणांची भरती होणार आहे. दरम्यान याकरिता 28 जानेवारीपर्यंत इच्छुक उमेदवारांना अर्ज दाखल करायचा आहे. तसेच उमेदवाराला सुमारे प्रतिमहिना 90,000 रूपये पगार दिला जाणार आहे. यामध्ये 12 इंग्रजी आणि 9 हिंदी शाखेतील पदं आहेत.

पार्लमेंटरी रिपोर्टर पदासाठी अर्ज करणारा उमेदवार पदवी उत्तीर्ण आणि शॉर्टहँड स्पीड 160 शब्द प्रति मिनीट इंग्रजी किंवा हिंदी असणं आवश्यक आहे. तसेच उमेदवाराकडे कॉम्प्युटरमधील सर्टिफिकेट कोर्स AICTE/NIELIT मान्यताप्राप्त किंवा ‘O’ लेव्हल कोर्स उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.

उमेदवाराची निवड शॉर्ट हॅन्ड टेस्ट, लेखी परीक्षा आणि मुलाखत या सर्व चाचण्या पार केल्यानंतर उमेदवार निवडला जाणार आहे. www.loksabha.nic.in या वेबसाईटवर Recruitment Advertisement & Notices या लिंकवर क्लिक करा. लेखी परीक्षेत पात्रता गुण मिळविणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी शॉर्ट लिस्ट केले जाणार आहे.