ESIC Recruitment 2020: आपण वैद्यकीय क्षेत्रात नोकरी शोधत असाल, तर आपल्यासाठी चांगली संधी आहे. कर्मचारी राज्य विमा महामंडळ (Employees’ State Insurance Corporation, ESIC Medical College ESIC) मेडिकल कॉलेजने विविध पदांसाठी रिक्त पदांची भरती सुरू केली आहे. त्याअंतर्गत प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक आणि सहकारी प्राध्यापक या पदांवर भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे की, या पदांसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख उद्या म्हणजे 31 डिसेंबर 2020 आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा असेल, त्यांनी त्वरित अर्ज करा.
इच्छुक आणि पात्र उमेदवार deanpgi-joka.wb@esic.nic.in वर ईमेलद्वारे किंवा डीन कार्यालयात पोस्टद्वारे विहित नमुन्यात असलेल्या पदांसाठी आवश्यक कागदपत्रे सादर करावेत. ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी अर्जाचा फॉर्म पूर्णपणे वाचून त्यानंतरचं अर्ज भरायला हवा. फॉर्ममध्ये काही दोष आढळल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो. (हेही वाचा - CBSE Board Exam 2021: केंद्र सरकारचा मोठा निर्णय; फेब्रुवारी 2021 पर्यंत होणार नाही सीबीएसई बोर्ड परीक्षा)
ईएसआयसी या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 23 पदांची भरती करणार आहे. यात 11 सहयोगी प्राध्यापक, 9 सहाय्यक प्राध्यापक आणि 3 प्राध्यापकांच्या पदांसाठी नेमणूक करण्यात येणार आहे. प्राध्यापक पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून डॉक्टर ऑफ मेडिसीन, मास्टर ऑफ डेंटल सर्जरी पदवी असणे आवश्यक आहे. सहाय्यक प्राध्यापक पदासाठी अर्ज करणारे उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेचे एमडी किंवा एमएस असावेत.
त्याचबरोबर, प्राध्यापक पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून डॉक्टर ऑफ मेडिसीन, मास्टर ऑफ डेंटल सर्जरीची पदवी असणे आवश्यक आहे. सहाय्यक प्राध्यापक पदावर अर्ज करणारे उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेचे एमडी किंवा एमएस असावेत.