NEFT सुविधेच्या माध्यमातून आता 24 तास पाठवता येणार पैसे, RBI कडून सामान्यांना दिलासा
बँक (Photo Credits: Twitter)

आरबीआयने (RBI) डिजिटल ट्राजेक्शनला चालना देण्यासाठी एक मोठे पाऊल उचचले आहे. तर आरबीआयकडून असे सांगण्यात आले आहे की, नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड्स ट्रान्सफर म्हणजेच NEFT साठी वर्किंग डे (Working Days) मध्ये 24 तास या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. एनईएफटी सुविधेच्या माध्यमातून पैसे एका खात्यामधून दुसऱ्या खात्यात अवघ्या काही वेळातच पाठवता येतात. या सुविधेत 50 हजार रुपयांपर्यंत पाठवता येतात. काही विशेष कामांसाठी पैसे ट्रान्सफर करण्यासाठी मर्यादा वाढवून दिली जाते.

आयसीआयसीआय बँकेच्या संकेतस्थावर देण्यात आलेल्या माहितीनुसार एनईफटीचा वापर वर्किंग डे मध्ये करता येते. तसेच चौथ्या आणि दुसऱ्या शनिवारी सर्व बँकांना सुट्टी असते. त्यामुळे एनईफटी सुविधेचा लाभ घेता येत नाही. तसेच सकाळी 8 ते संध्याकाळी 6.30 वाजेपर्यंत एनईएफटी सुविधेचा लाभ ग्राहकांना घेता येतो.(ग्राहकांसाठी RTGS आणि NEFT च्या वेळेत वाढ)

MPC च्या बैठकीनंतर आरबीआय गवर्नर यांनी असे म्हटले आहे की, बँकेच्या वर्किंग डे मध्ये आता 24 तास एनईफटीच्या सुविधेचा लाभ खाते धारकांना घेता येणार आहे. त्याचसोबत आरबीआयने नुकतेच आरटीजीएस आणि एनईएफटीच्या माध्यमातून पैसे पाठवण्यासाठी आकारण्यात येणाऱ्या अतिरिक्त शुल्क काढून टाकले आहेत. तर डिजिटल ट्रांजेक्शनला चालना मिळावी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. आरबीआयने जाहीर केलेल्या आकड्यानुसार एप्रिल महिन्यात एनईएफटीच्या माध्यमातून 20.34 कोटी ट्राजेक्शन झाले आहेत. आरटीजीएसच्या माध्यमातून 1.14 कोट्यावधींची देवाण-घेवाण करण्यात आली आहे.