Republic Day 2023 Parade: प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये दिसणार नौदलाची महिला शक्ती; Disha Amrith करणार  नौदलाच्या तुकडीचे नेतृत्व
Disha Amrith (PC - ANI)

Republic Day 2023 Parade: भारतीय नौदलाच्या एअर ऑपरेशन्स ऑफिसर लेफ्टनंट कमांडर दिशा अमृत (Disha Amrith) प्रजासत्ताक दिनाच्या परेड (Republic Day Parade) मध्ये त्यांच्या दलातील 144 तरुण नौसैनिकांच्या तुकडीचे नेतृत्व करणार असून दिशा नौदलाची झांकी 'नारी शक्ती'चे प्रदर्शित करेल. तीन महिला आणि पाच पुरुष अग्निवीर देखील ड्युटी मार्गावरील परेडमध्ये सहभागी होणार आहेत. दिशा अमृत ​​व्यतिरिक्त, आणखी एक महिला अधिकारी- सब लेफ्टनंट वल्ली मीना एस या नौदल दलाच्या तीन प्लाटून कमांडरमध्ये सामील होतील.

कर्नाटकच्या BMS कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधून संगणक शास्त्रातील अभियांत्रिकी पदवीधर, 29 वर्षीय अमृत 2008 मध्ये नॅशनल कॅडेट कॉर्प्स (NCC) प्रजासत्ताक दिनी टीमचा एक भाग होती. दिशाने दिल्लीतील समारंभात लष्कराच्या तीन शाखांपैकी एकाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मार्चिंग टीमचा एक भाग होण्याचे स्वप्न बाळगळं होतं. यासंदर्भात बोलताना दिशा म्हणाली की, 2008 पासून, मी प्रजासत्ताक दिनाच्या सशस्त्र दलाच्या तुकडीचा एक भाग होण्याचे स्वप्न पाहत होते. भारतीय नौदलाने मला दिलेली ही एक अद्भुत संधी आहे." (हेही वाचा -Republic Day 2023 Date in India: भारतात प्रजासत्ताक दिन का साजरा केला जातो? भारताचे संविधान लागू झाले त्या दिवसाचा इतिहास आणि महत्त्व जाणून घ्या)

मूळची मंगळुरू येथील दिशा 2016 मध्ये नौदलात रुजू झाली होती आणि 2017 मध्ये तिचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर ती अंदमान आणि निकोबार बेटांमधील प्रमुख नौदल प्रतिष्ठानमध्ये तैनात आहे. दिशाने सांगितलं की, ती डॉर्नियर विमानाचा वैमानिक आहे. गेल्या महिन्यात नौदल प्रमुख अॅडमिरल आर हरी कुमार यांनी म्हटले होते की नौदल 2023 पासून महिलांसाठी आपल्या सर्व शाखा उघडण्याचा विचार करत आहे. तिचा अनुभव शेअर करताना दिशा अमृतने सांगितले की, तिला नेहमी सशस्त्र दलाचा भाग व्हायचे होते आणि काही प्रमाणात तिच्या पालकांनीही तिला यासाठी प्रेरित केले.

ती म्हणाली, “माझ्या वडिलांनाही सशस्त्र दलाचा भाग व्हायचे होते. पण ते होऊ शकले नाही. मला नौदलाचा एक भाग असल्याचा अभिमान आहे आणि यापुढेही मोठ्या आवेशाने आणि समर्पणाने नौदलाची सेवा करत राहीन.