Lok Sabha Constituencies of Vidarbha | (Only representative image)

Milind Deora vs Arvind Sawant: लोकसभा निवडणूक 2019 (Lok Sabha Elections)साठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सुरु झाली असून, निकालही हाती येण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील एकूण 48 लोकसभा मतदारसंघांपैकी एक असलेल्या मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघ आणि या मतदारसघातील उमेदवारांचे मताधिक्यही हाती येत आहे. शिवसेनेच्या अरविंद सावंत आणि कॉंग्रेसच्या मिलिंद देवरा यांच्यामध्ये या मतदारसंघात चुरशीची लढत पहायला मिळाली आहे.

जाणून घ्या महाराष्ट्रासह संपूर्ण भारताचा निकाल एका क्लिकवर, पाहा लाइव अपडेट्स

मिलिंद देवरा यांनी काही दिवसांपूर्वी ईव्हीएम मशीनच्या सुरक्षिततेवरून निवडणूक आयोगाकडे तक्रार करत पत्र लिहले होते. आता मुंबईतील या हाय प्रोफाईल मतदारसंघांमधून खासदार कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. Maharashtra Lok Sabha Elections 2019 Exit Poll Results : महाराष्ट्र लोकसभा निवडणूक एक्झिट पोल अंदाज इथे पाहा सविस्तर

महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यातील मतदानामध्ये मुंबई दक्षिण भागामध्ये मतदान पार पडले आहे. या मतदारसंघात सध्या शिवसेनेचे अरविंद सावंत हे विद्यमान खासदार आहेत. 11 एप्रिल ते 19 मे दरम्यान सात टप्प्यात लोकसभा निवडणूक मतदान पार पडले. यंदाचे एक्झिट पोल एनडीएच्या बाजुने आहेत. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या मतमोजणीकडे उमेदवारांसोबतच मतदारांचे लक्ष लागले आहे.