Maharashtra Lok Sabha Election Exit Poll Results 2019: लोकसभा निवडणूक 2019 मतमोजणी प्रत्यक्षात 23 एप्रिल 2019 रोजी आहे. या मतमोजणीबद्दल प्रचंड उत्सुकता असली तरी, विविध एक्झिट पोल्सनी आपापले अंदाज वर्तवत महाराष्ट्रात लोकसभा निकाल कसे असतील याबाबत भविष्य वर्तवले आहे. एबीपी माझा, टाईम्स नाऊ, टीव्ही 9 आणि इतर वृत्तवाहिन्या आणि संस्थांनी हे एक्झिट पोल जाहीर केले आहेत. एक्झिट पोलच्या एकूण भविष्यवाणीवर नजर टाकता महाराष्ट्र राज्य लोकसभा निवडणूक निकाल 2019 हे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांसाठी दिलासादायक तर, भाजप, शिवसेना इतरांसाठी धक्कादायक असे आहेत. महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीची हवा, शिवसेना - भाजप युतीला फटका बसणार असा कल एक्झिट पोल दर्शवतात. जाणून घ्या महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा? काय सांगतो एक्झिट पोलचे लेटेस्ट अपडेट्स
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक एक्झिट पोल्स 2019 आकडेवारी
एबीपी माझा- नेल्सन एक्झिट पोल
महाराष्ट्र एकूण जागा - 48
राष्ट्रवादी काँग्रेस - 9
राष्ट्रीय काँग्रेस - 4
शिवसेना - 17
भाजप - 17
वंचित बहुजन आघाडी - 00
इतर - 1
आघाडी - एकूण जागा: 13
युती - एकूण जागा: 34
टाईम्स नाऊ - व्हिएमआर चा एक्झिट पोल
महाराष्ट्र एकूण जागा - 48
आघाडी - एकूण जागा: 10
युती - एकूण जागा: 38
आजतक अॅक्सिस चा एक्झिट पोल
महाराष्ट्र एकूण जागा - 48
राष्ट्रीय काँग्रेस - 6
भाजप - 38
टीव्ही 9 आणि सी व्होटर चा एक्झिट पोल
महाराष्ट्र एकूण जागा - 48
राष्ट्रवादी काँग्रेस - 6
राष्ट्रीय काँग्रेस - 8
शिवसेना - 15
भाजप - 19
वंचित बहुजन आघाडी - 00
इतर - 0
आघाडी - एकूण जागा: 14
युती - एकूण जागा: 34
मुख्य निवडणूक आयुक्त सुनील आरोरा यांनी 28 एप्रिल 2019 रोजी लोकसभा निवडणूक 2019 ची घोषणा केली होती. दिल्ली येथील विज्ञान भवन येथे केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रम आणि वेळापत्रकानुसार ही निवडणूक एकूण 7 टप्प्यांत पार पडली. त्यापैकी पहिल्या टप्प्यात 20 राज्यांतील 91 मतदारसंघ, दुसऱ्या टप्प्यात 14 राज्यांतील 97 मतदारसंघ, 3ऱ्या टप्प्यात 14 राज्यातील 115 मतदारसंघ, 4थ्या टप्प्यात 9 राज्यातील 71 मतदारसंघ, 5व्या टप्प्यात 7 राज्यांत 51 मतदारसंघ, 6व्या टप्प्यात 7 राज्यातील 59 मतदारसंघात आणि 7 व्या टप्प्यात 8 राज्यातील 59 मतदासंघात अनुक्रमे 11 एप्रिल, 18 एप्रिल, 23 एप्रिल, 29 एप्रिल, 6 मे, 12 मे आणि 19 मे रोजी मतदान पार पडले.