मुंबई: EVM Tampering च्या धास्तीने कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष मिलिंद देवरा यांचं महाराष्ट्र निवडणूक आयोगाला पत्र
मिलिंद देवरा (फोटो सौजन्य-फेसबुक)

मुंबई कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी आज महाराष्ट्र निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. सध्या केंद्रासह राज्यातही विरोधक ईव्हिएमच्या सुरक्षेवरून ( EVM Tampering) एकवटले आहेत. आज मुंबईमध्ये कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष मिलिंद देवरा यांनी महाराष्ट्र निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. काही गाड्यांची संशयास्पद हालचाल होत असल्याचा त्यांनी आरोप केला आहे.

मिलिंद देवरा Tweet

ईव्हीएम मशीनच्या सुरक्षेसाठी जेथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत तेथील पासवर्ड कॉंग्रेस पक्षासोबतही शेअर केले जावेत ज्यामुळे त्यावर लक्ष ठेवणं शक्य होईल आणि ईव्हिएम मशीनची सुरक्षा पारदर्शक होईल. देशामध्ये काही भागामध्ये ईव्हिएम मशीन संशयास्पदरित्या घेऊन जात असताना आढळल्यानंतर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. आज प्रणब मुखर्जी यांनी देखील केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.

11 एप्रिल ते 19 मे दरम्यान लोकसभा निवडणूक 2019 सात टप्प्यांमध्ये पार पडली आहे. एक्झिट पोलनुसार एनडीए च्या बाजूने कौल असल्याचं सांगण्यात आलं आहे. या निवडणूकीचा अंतिम निकाल 23 मे दिवशी लागणार आहे.