पावसाची वाट बघणाऱ्या मुंबईकरांना रविवारी पावसाच्या सरींच्या आगमनाने दिलासा मिळाला. मुंबई ठाण्यासह राज्यातील बऱ्याच ठिकाणी पावसाची दमदार एंट्री बघायला मिळाली. दरवर्षी पहिला पाऊस हा असाच सुखद अनुभव घेऊन येतो पण नंतर मात्र ठिकठिकाणी होणाऱ्या आप्ततेच्या घटना, वाहतुकीच्या समस्यांनी या आनंदाला गालबोट लागते. यंदा मात्र पावसाळ्यात नागरिकांना होणार त्रास कमी व्हावा यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) व (MMRDA) ने चांगलीच कंबर कसली आहे. अलीकडेच या दोन्ही विभागणाच्या विद्यमाने MCGM या मोबाईल ऍपची निर्मिती करण्यात आली आहे. यासोबतच बीएमसी तर्फे नागरिकांसाठी 1916 हा विनाशुल्क हेल्पलाईन क्रमांक (Toll Free Helpline) देखील सुरु करण्यात आला आहे. मुंबईत कोणत्याही परिसरात पावसाळ्याच्या दरम्यान आपत्तीजन्य परिस्थिती आढळल्यास नागरिक या माध्यमातून तातडीची मदत मिळवू शकणार आहेत.
आपत्ती व्यवस्थापन कक्ष ट्विट
Hope #MumbaiRains have brought you some respite from the heat Mumbaikars! If the pleasant rains bring any unpleasant experience please dial 1916 Download the disaster management (MCGM) App NOW for real time updates & emergency support for a #SafeMonsoon @AUThackeray @MahaDGIPR pic.twitter.com/hDIjQqGm4y
— Disaster Management Department (MCGM) (@DisasterMgmtBMC) June 10, 2019
MCGM या ऍपमध्ये असणाऱ्या विशेष सुविधेमार्फत आपत्तीमध्ये अडकलेले नागरिक आपले नेमके ठिकाण जीपीएस वरून बीएमसीच्या अधिकाऱ्यांशी शेअर करू शकतात. ज्यानुसार लगतच्या भागात उपस्थित मदत अधिकाऱ्याचा संपर्क क्रमांक गरजूंना पुरवण्यात येईल. तसेच यंदा मुंबईच्या किनारपट्टीलगतच्या भागात अनेक रस्ता बांधणीचे प्रकल्प सुरु आहेत त्यामुळे नागरिकांना गरज लागल्यास ते संबंधित ठिकाणी उपस्थित कर्मचाऱ्यांची देखील मदत मिळवू शकतात. याशिवाय पालिकेद्वारे किनार्याच्या लगतच्या भागात कार्यरत काही अधिकाऱ्यांचे व नियंत्रण कक्षांचे क्रमांक शेअर करण्यात आले आहेत. Cyclone Vayu गुजरातच्या दिशेने, उद्या मुंबईत धडकणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज
आपत्तीकाळात या क्रमांकावर साधा संपर्क
अमरसन्स गार्डन नियंत्रण कक्ष : 022-23610221
नियंत्रण कक्षाचे अधीक्षक कार्यालय: 967061106 and 823567841
प्रोजेक्ट मॅनेजर देवेंद्र प्रसाद : 9967014362
रहिवाशी इंजिनिअर राजेश यादव : 9702467575
वरळी डेरी : 022-24900359
नियंत्रण कक्ष व्यवस्थापक अविक पंजा : 9874442300
प्रोजेक्ट मॅनेजर: 9136993702
प्रियदर्शनी पार्क नियंत्रण कक्ष : 022-23629410
नियंत्रण कक्ष अधिकारी : 9958899501 and 9958793012
प्रोजेक्ट मॅनेजर किम झोन्ग यांग: 7045901366
रहिवाशी इंजिनिअर विजय जंगम : 7045901366
MMRDA टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक: 26594176, 26591241, 1800228801 ,8657402090
बीएमसी व MMRDA तर्फे तयार करण्यात आलेला हा मोबाईल ऍप तुम्ही गुगल प्ले स्टोअर वरून डाउनलोड करू शकता.