Card-Less Cash Withdrawal: आता कार्डशिवाय कोणत्याही ATM मधून काढता येणार पैसे;  RBI गव्हर्नरने केली मोठी घोषणा
ATM | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Card-Less Cash Withdrawal: तुम्ही एटीएममधून पैसे काढत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. आता एटीएम (ATM) कार्डशिवायही पैसे काढता येणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) गव्हर्नर शक्तीकांत दास (Shaktikanta Das)  यांनी ही घोषणा केली आहे. आतापर्यंत ही सुविधा काही बँकांमध्येच उपलब्ध होती.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की, आता डेबिट कार्डशिवाय एटीएममधून पैसे काढण्याची सुविधा सर्व बँकांमध्ये दिली जाईल. आतापर्यंत फक्त काही बँकांमध्ये कार्डशिवाय एटीएममधून पैसे काढण्याची सुविधा होती. त्यांनी सांगितले की, UPI च्या माध्यमातून एटीएममधून पैसे काढता येतात. (हेही वाचा - PAN Aadhaar Card Linking: दंड भरून तुमचं आधार कार्ड-पॅन कार्ड लिकिंग कसं कराल पूर्ण)

शक्तिकांत दास यांच्या मते, यामुळे कार्ड क्लोन करून पैसे काढण्याची फसवणूकही कमी होईल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत भारतीय रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी शुक्रवारी चलनविषयक धोरण जाहीर केले.

रेपो दरात कोणताही बदल नाही -

दरम्यान, एमपीसीने पॉलिसी दरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. रेपो दर 4 टक्क्यांवर कायम आहे. मध्यवर्ती बँकेने व्याजदरात बदल न करण्याची ही सलग 11वी वेळ आहे. यापूर्वी, रिझर्व्ह बँकेने 22 मे 2020 रोजी रेपो दरात शेवटचा बदल केला होता.