How To Vote #India? लोकसभा निवडणूक 2019 च्या दुसऱ्या टप्प्यात मतदानाच्या संदेशासह मतदान कसं कराल हे सांगणारं 'गूगल डूडल'
How to vote India Google Doodle (Photo Credits: Google)

How To Vote #India? Google Doodle: देशात सुरु असलेल्या लोकसभा निवडणूक 2019 चे (Lok Sabha Elections 2019) दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडणार आहे. यासाठी गुगलने खास डुडल साकारले आहे. How to Vote असे गुगल डुडल साकारत मतदारांना मतदानाचे आवाहन केले. तर मतदानाची प्रक्रीया देखील समजावून सांगितली आहे. लोकसभा निवडणुकीचे पहिल्या टप्प्यातील मतदान 11 एप्रिल रोजी पार पडले. त्या दिवशीही गुगलने तर How To Vote #India? असे गुगल डुडल साकारत मतदारांना मतदानाचा संदेश दिला होता आणि मतदान कसं करावं हे देखील सांगण्यात आलं होतं. आता पुन्हा एकदा गुगल डुडलवर मतदानाचा उत्साह दिसत आहे.

गुगलने साकारलेल्या या खास डुडल द्वारे प्रथम मतदान करणाऱ्या मतदारांना मतदान कसे करावे, तुमचे मतदान केंद्र कसे ओळखावे यांसारखी माहिती दिली आहे. कसं कराल लोकसभा निवडणूक 2019 मतदान? हे सांगणारं गुगल डुडल 

देशात 543 मतदारासंघांसाठी मतदान होणार असून हे सात टप्प्यात तर राज्यात चार टप्प्यात मतदान प्रक्रीया पार पडणार आहे. तर मतमोजणी 23 मे ला पार पडणार आहे.

मतदानाची प्रक्रीया समजवणारा व्हिडिओ:

आज महाराष्ट्रात 10 मतदारसंघात तर देशातील 95 मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे. गुगलने मतदान केंद्रावर कसे मतदान करावे आणि इतर माहिती डुडलद्वारे दिली आहे.