लोकसभा निवडणूक 2019 (Lok Sabha Elections) च्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज (11 एप्रिल) दिवशी आहे. मतदान करण्याचं आवाहन (How to Vote India) आज गूगल डूडलच्या (Google Doodle) माध्यमातूनही करण्यात आले आहे. नवमतदारांना प्रोत्साहीत करण्यासाठी आज खास गूगल डूडल शेअर केलं आहे. या गूगल डूडल सोबतच मतदान कसं करायचं याची माहिती देखील देण्यात आली आहे. यंदा लोकसभा निवडणूक देशात सात आणि महाराष्ट्रात चार टप्प्यांमध्ये पार पडणार आहे.आज पहिल्या टप्प्यातील मतदानामध्ये एकून 91 मतदारसंघात मतदान होईल.(Lok Sabha Election 2019: घरबसल्या मतदार यादीमध्ये तुमचं नाव, मतदान केंद्र कसं पहाल?)
कसं कराल लोकसभा निवडणूक 2019 मतदान?
- 18 वर्षावरील सज्ञान नागरिक त्याच्या ओळखपत्रासोबत मतदान करू शकतो.
- मतदान करण्याची अनुमती केवळ ज्याचं नाव अधिकृत मतदान यादीमध्ये आहे त्यांनाच मिळू शकतो.
- मतदार यादीमध्ये नाव पाहिल्यानंतर तुमचं ओळखपत्र पाहिलं जाईल. तुम्हांला निवडणूक आयोगाच्या रजिस्टरवर स्वाक्षरी / अंगठा द्यावा लागतो.
- त्यानंतर तुमच्या बोटावर शाई लावली जाईल.
- पुढे ईव्हीएम मशीनवर तुम्हांला ज्यांना मतदान करायचं आहे त्याच्या नाव आणि चिन्हासमोरील बटण दाबून मत रजिस्टर करता येऊ शकतं.
- यंदा ईव्हीएम सोबत व्हीव्हीपॅट मशीनदेखील असतील. त्यामध्ये तुम्ही दिलेले मत योग्य उमेदवाराला किंवा नोटाला दिले आहे की नाही याची तुम्हांला माहिती स्क्रीनवर आणि एका स्लिपच्या माध्यमातून मिळेल. मतदारयादीतील नावाप्रमाणेच ऑनलाईन आणि SMS च्या माध्यमातून तुमचं मतदान केंद्र देखील पाहण्याची सोय आहे.
महाराष्ट्रामध्ये आज विदर्भातील सात मतदारसंघांमध्ये मतदान होईल. याकरिता सकाळी 7 ते संध्याकाळी 6 या वेळेमध्ये मतदान करता येईल. या मतदानाची मतमोजणी 23 मे 2019 दिवशी होणार आहे.