आज 17 व्या लोकसभा निवडणूकीसाठी चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडले. आजच्या चौथ्या टप्प्यात देशातील 9 राज्यातील 72 जागांसाठी मतदान झाले. यात महाराष्ट्रातील 17, राजस्थान आणि उत्तर प्रदेशातील 13-13, पश्चिम बंगालमधील 8 आणि ओडिशा-मध्य प्रदेशातील 6-6, बिहारमधील पाच आणि झारखंड मधील 3 जागांचा समावेश होता. त्याचबरोबर जम्मू-काश्मीर येथील अनंतनाग या जागेसाठी देखील आज मतदान झाले.
तर महाराष्ट्रात आजच्या अंतिम टप्प्यात धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, उत्तर पूर्व मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण, मावळ, शिरुर, शिर्डी, नंदूरबार या 17 मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रीया पार पडली.
सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान झाले असून लोकसभा निवडणूकीच्या चौथ्या टप्प्यात देशात 64% मतदान, तर महाराष्ट्रात अंतिम टप्प्यात 57% मतदानाची नोंद झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. तर राज्यात चार टप्प्यात मिळून एकूण 60.67% मतदान झाले आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, कल्याणमध्ये सर्वात कमी तर गडचिरोलीत सर्वाधिक मतदान झाले आहे. तर 2014 इतकंच यंदाची मतदान झालं आहे.
महाराष्ट्रातील 17 मतदारसंघात झालेल्या मतदानाची सरासरी टक्केवारी:
धुळे- 67.29%
दिंडोरी- 64.24%
नाशिक- 55.41%
पालघर- 64.09%
भिवंडी- 53.68%
कल्याण- 44.27%
ठाणे- 49.95%
मुंबई उत्तर- 59.32%
उत्तर पश्चिम मुंबई- 54.71%
उत्तर पूर्व मुंबई- 56.31%
मुंबई उत्तर मध्य- 52.84%
मुंबई दक्षिण मध्य- 55.35%
मुंबई दक्षिण- 52.15%
मावळ- 59.12%
शिरुर- 59.55%
शिर्डी- 60.42%
नंदूरबार- 67.64%
देशातील मतदानाची टक्केवारी:
Estimated voter turnout till 5 pm for the 4th phase of #LokSabhaElections2019 is 50.6%. Voting is underway in 72 constituencies, across 9 states. pic.twitter.com/l1ckiEM6fa
— ANI (@ANI) April 29, 2019
महाराष्ट्रातील मतदानाची प्रक्रीया पूर्ण झाली असून देशात अजून 3 टप्प्यात मतदान होणार आहे. 23 मे रोजी मतमोजणी झाल्यावर निवडणूकीचा निकाल हाती येईल.