LIC | File Image

नव्या नोकरीच्या शोधात असणार्‍यांना आता भारत जीवन बीमा निगम (LIC) मध्ये नोकरीची संधी उपलब्ध आहे. एलआयसी हाऊसिंग फाऊसिंग फायनान्स (LIC Housing Finance Ltd) मधील ही नोकरभरती जाहीर करण्यात आली आहे. असोसिएट (Associate) या पदासाठी नोकरी असून निवड झालेल्या उमेदवाराला 9 लाखांचे पॅकेज दिले जाणार आहे. दरम्यान त्यासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून तुम्ही ही यासाठी इच्छुक असाल तर जाणून घ्या नेमका अर्ज कसा करायचा? पात्रता निकष काय आहेत आणि कधी पर्यंत अर्ज करता येऊ शकतो? या तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर. (नक्की वाचा: Indian Railway Recruitment 2021: भारतीय रेल्वे 10 वी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी; rrc-wr.com वर 24 जून पर्यंत असा करा अर्ज).

LIC मधील Associate पदासाठीची महत्त्वाची माहिती

पद - असोसिएट

जागा किती - 6

वार्षिक पॅकेज - 6-9 लाख

अर्ज कसा कराल - lichousing.com वर ऑनलाईन

अर्ज प्रक्रिया सुरू करण्याची तारीख - 24 मे 2021

अर्ज करण्याची अंतिम तारीख - 7 जून 2021

अर्ज शुल्क - निशुल्क

पात्रता निकष काय ?

LIC मधील Associate पदासाठी अर्ज करणार्‍याला सोशल वर्क किंवा रूरल मॅनेजमेंटमध्ये किमान 55% सह पदव्युत्तर पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले असणं आवश्यक आहे. वयाच्या दृष्टीने 1 जानेवारी 2021 पर्यंत वय 23 ते 30 वर्षांच्या दरम्यानचेच उमेदवार यासाठी पात्र असतील. PDF स्वरूपात इथे पहा नोटिफिकेशन.

दरम्यान ऑनलाईन अर्ज आल्यानंतर पात्र उमेदवारांची ऑनलाईन चाचणी घेतली जाणार आहे. या परीक्षेच्या निकालावर मेरिट लिस्ट जाहीर होईल आणि मुलाखतीच्या नंतर सहा उमेदवार निवडले जाणार आहेत.