Representational Image (Photo Credits: PTI)

कोरोना संकटात अनेकांच्या नोकर्‍या गेल्या. उद्योग धंदे बंद पडल्याने कमी शिक्षित तरूण मंडळींवर आता बेरोजगारीचं संकट घोंघावत आहे. पण यामध्येच एक आशेचा किरण आता अशा बेरोजगार तरूणांना खुणावत आहे. नुकतीच भारतीय रेल्वेकडून (Indian Railway) एक नोकरभरती जाहीर करण्यात आली आहे. आज 25 मे पासून त्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. मग ही नोकरीची संधी नेमकी आहे कुठे? कोण, कसा, कधी करू शकतो अर्ज हे सारं जाणून घेण्यासाठी खालील माहिती नक्की वाचा.

भारतीय रेल्वेच्या नोटिफिकेशन नुसार सध्या 3,591 जागांवर नोकरभरती होणार आहे. यामध्ये कारपेंटर, इलेक्ट्रिशन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, पेंटर, पाईप फीटर, ड्राफ्ट्समॅन, डिझेल मेकॅनिक, रेफ्रिजरेटर एसी मेकॅनिक अशा 17 विविध पदांवर नोकरभरती होणार आहे. दरम्यान आजपासून 24 जूनच्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत इच्छुक उमेदवार नोकरभरती साठी अर्ज करू शकतात.  इथे पहा अधिकृत नोटिफिकेशन.

दरम्यान इच्छुक उमेदवार किमान 10 वी पास असणं आवश्यक आहे. त्याच्याकडे आयटीआय चं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. तसेच 10वीत किमान 50% गुण आवश्यक आहेत. अर्ज करणार्‍या उमेदवाराची वयोमर्यादा 15-24 वर्ष आवश्यक आहे . दरम्यान जातीनुसार आरक्षण असणार्‍यांना 5 वर्षअधिक मिळणार आहेत. अर्ज करताना 100 रूपये शुल्क भरावा लागणार आहे. तर महिला आणि एस सी, एसटी, दिव्यांग यांना हे शुल्क माफ असेल. ऑनलाईन अर्ज करतानाच हे शुल्क देखील भरावं लागणार आहे. India Post GDS Recruitment 2021: महाराष्ट्र आणि बिहार येथे जीडीएसच्या 4368 पदांवर नोकर भरती, 26 मे पर्यंत करता येईल अर्ज.

निवड प्रक्रियेसाठी कोणतीही परीक्षा किंवा मुलाखत नसेल. मार्कांच्या आधारेच उमेदवार निवडला जाणार आहे. त्यानंतर प्रशिक्षण देऊन उमेदवाराला स्टायपेंट देखील दिले जाणार आहे.