Representational Image (Photo Credits: File Photo)

India Post GDS Recruitment 2021: भारतीय डाक विभागाकडून ग्रामीण डाक सेवक, जीडीएसच्या पदांवर नोकर भरती करण्यासंबंधित एक नोटीस जाहीर केली आहे. यामध्ये एकूण 4368 पदांवर नियुक्ती केली जाणार आहे. ही भरती विविध क्षेत्रासाठी काढण्यात आली आहे. यामध्ये बिहार येथे 1940 पद आणि महाराष्ट्रातील 2428 पदांवर नियुक्ती केली जाणार आहे. ग्रामीण डाक सेवक भरती 2021 साठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी गणित आणि इंग्रजीसह 10 वी उत्तीर्ण असावे.

तर उमेदवाराचे वय कमीतकमी 10 सह स्थानिक भाषा माहिती असावी. तसेच वय हे 18 ते 40 वर्षापर्यंत असावे. राखीव वर्गासाठी सरकारच्या नियमानुसार वयात सुट दिली जाणार आहे. तर ईडब्लूएस श्रेणीसाठी वयात कोणतीही सूट दिली जाणार नाही आहे. उमेदवारांनी लक्षात ठेवावे की त्यांचे निवड ही मेरिट लिस्टच्या आधारावर केली जाणार आहे. ही मेरिट लिस्ट 10वी मध्ये मिळालेल्या गुणांवर आधारित असणार आहे.(बँक खातेधारकांसाठी महत्वाची बातमी! 'या' तारखेपासून बदलणार कामकाजासंबंधित नियम)

नोकर भरती संदर्भात अधिक माहिती-

-एकूण 4368 पद

-बिहार पोस्टल डाक सर्कल येथे 1940 पद

-महाराष्ट्र पोस्टल डाक सर्कल येथे 2428 पद

युआर, ओबीसी, ईडब्लूएस पुरुष उमेदवारांना 100 रुपये शुल्क भरावा लागणार आहे. तर एससी आणि एसटी महिला उमेदवारांना कोणताही शुल्क भरावा लागणार नाही. जीडीएसच्या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वात प्रथम अधिकृत वेबसाइट appost.in येथे भेट द्यावी. त्यानंतर रजिस्ट्रेशन झाल्यानंतर युनिक रजिस्ट्रेशन आयडी क्रमांक मिळणार आहे.

आता शुल्क भरण्यासाठी युआर, ओबीसी आणि ईडब्लूएस पुरुष/ट्रान्स-मॅन यांना शुल्क भरावा लागणार आहे. उमेदवारांनी लक्षात ठेवावे की, त्यांनी शुल्क भरल्यानंतर कोणतीही पुष्टी न झाल्यास त्यांनी 72 तास वाट पहावी. ऑफलाइन पद्धतीने शुल्क भरण्यासाठी कोणत्याही पोस्टल ऑफिसमध्ये जाऊ शकता. त्यानंतर अर्ज करा आणि कागदपत्र जोडून पोस्ट अपलोड करा. त्यानंतर फॉर्म पुन्हा एकदा क्रॉसचेक करुन त्याची प्रिंट आउट घ्या.