Konkan Railway Recruitment 2021: कोकण  रेल्वेत नोकरीची संधी; 29 जुलै पर्यंत थेट मुलाखती द्वारा निवडले जाणार उमेदवार
Railway Travel | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

नोकरीच्या शोधात असणार्‍या इंजिनियर तरूणांसाठी कोकण रेल्वेने नोकरभरती जाहीर केली आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KONKAN RAILWAY CORPORATION LIMITED) ने रस्ता, सुरंग आणि नवी रेल्वे लाइन निर्माण संबंधित कामांसाठी ही नोकरभरई जाहीर करताना थेट मुलाखतींवरून उमेदवार निवडले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. सिव्हिल इंजिनीअरिंग विभागामध्ये प्रोजेक्ट इंजिनीअर, एसटी आणि जेटीएच्या पदांवर होणार्‍या या नोकरभरतीमध्ये 27 ते 29 जुलै दरम्यान मुलाखती होणार आहेत.

दरम्यान इच्छुक उमेदवारांना कोकण रेल्वे एक्झिक्युटिव्ह क्लब, सेक्टर 40, सीवूडस-वेस्ट, नवी मुंबई -76 या पत्त्यावर होणाऱ्या मुलाखतीमध्ये सहभागी व्हावं लागणार आहे. SSC Recruitment 2020-21: SSC कडून भारत सरकारच्या मंत्रालय, विभागांमध्ये 7035 पदांवर नोकरभरती जाहीर.

कोकण रेल्वे रेल्वे भरती बाबत महत्त्वाचे अपडेट्स

मुलाखतीच्या तारखा -27-29 जुलै 2021

प्रोजेक्ट इंजिनीअर -1 पद

एसटीए - 5 पदं

जेटीए- 1पद

इथे पहा कोकण रेल्वे नोकरीची संधीचं अधिकृत नोटिफिकेशन .

कोकण रेल्वे भरतीमध्ये सहभागी उमेदवार प्रोजेक्ट इंजिनीअर पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून बॅचलर ऑफ इंजिनीअरिंग (सिविल) किंवा त्या सारख्या शाखेत पदवीचे शिक्षण घेतलेला असावा. एसटीए पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून बॅचलर ऑफ इंजिनीअरिंग किंवा त्यासारख्या शाखेतून पदवी घेतलेला असावा. तसेच जेटीएसाठी मान्यता प्राप्त (एसआयसीटीई) विद्यापीठातून सिविल इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा किंवा डिग्री असणे आवश्यक आहे.

कोकण रेल्वे भरतीसाठी प्रोजेक्ट इंजिनीअरिंग साठी 45 वर्षे, सिनिअर टेक्निकल असिस्टंट पदासाठी 35 वर्षे, सिनीअर टेक्नीकल असिस्टंट साठी 35 वर्षे, ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट 30 वर्षे, सिनिअर टेक्निकल असिस्टंट 35 वर्षे वयोमर्यादा आहे. ही नोकरीची संधी केरळ, नेपाळ आणि अन्य ठिकाणच्या प्रोजेक्ट साठी आहे. यामध्ये केरळच्या प्रोजेक्ट इंजिनियरला 65,637 रूपये, सिनियर टेक्निकल असिस्टंटला 52,533 रूपये पगार असेल तर नेपाळमध्ये ज्युनियर टेक्निकल असिस्टंटला 41, 418 रूपये, सिनियर टेक्निकल असिस्टंटला 52,533 रूपये पगार असेल.