SSC CGL Recruitment 2020-21: स्टाफ सिलेक्शन कमिशन Combined Graduate Level (CGL) परीक्षा यंदा 13 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट 2021 दरम्यान घेणार आहे. त्यामुळे सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या अनेकांसाठी ही सुवर्णसंधी आहे. या परीक्षेच्या माध्यमातून विविध मंत्रालयामध्ये, विभागांमध्ये तसेच भारत सरकारच्या कार्यालयांमध्ये सुमारे 7035 जागांवर नोकरभरती केली जाणार आहे. चार टप्प्यामधून उमेदवारांना जावं लागणार आहे. त्यापैकी पहिला टप्पा परीक्षा असणार आहे. SSC CGL 2020-21 recruitment साठी चार लेव्हलच्या परीक्षा असतील. Tier-1 Exam उत्तीर्ण झालेले Tier-2 exam साठी पात्र असतील.
एसएससीच्या माहितीनुसार, SC CGL 2020-21 recruitment अम्ध्ये 2891 जागा या खुल्या प्रवर्गासाठी असतील. 1,046 जागा एससी उमेदवारांसाठी, 510 जागा एसटी उमेदवारांसाठी आणि 1858 जागा ओबीसी वर्गासाठी असतील.730 जागा EWS प्रवर्गासाठी राखीव असणार आहेत. SSC CGL 2020 चं अॅडमीट कार्ड जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जारी केले जाईल.
SSC CGL Recruitment मधून निवडल्या जाणार्या उमेदवाराला पे स्केल 4 अर्थात (Rs 25,500 to 81,100)ते कमाल पे स्केल 8 Rs 47,600 to 1,51,100 इतका असणार आहे. दरम्यान या परीक्षेसाठी यापूर्वीच विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज दाखल केलेले आहेत. 29 डिसेंबर 2020 ते 31 जानेवारी 2021 पर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करण्याची वेळ होती. दरम्यान ही परीक्षा कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर लांबणीवर पडली होती पण आता परिस्थिती निवळत असल्याने आणि लसीकरणाचा वेग वाढत असल्याने परीक्षांच्या नव्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.