Konkan Railway Recruitment 2021: कोकण रेल्वेत नोकरीची संधी; जाणून घ्या पात्रता, वयोमर्यादा आणि निवड प्रक्रीया
Representational Image (Photo Credits: PTI)

सरकारी नोकरीच्या (Government Job) शोधात असलेल्यांसाठी सुवार्ता आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (Konkan Railway Corporation Limited) मध्ये अभियांत्रिकी पदवीधरांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेवारांचे अर्ज मागवण्यात आले आहेत. दरम्यान, या नोकरीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता (Educational Qualification), पद (Post), जागा (Vacancy), वयोमर्यादा (Age Limit), वेतन (Salary) यासंदर्भात जाणून घेऊया... (IDBI Recruitment 2021: आयडीबीआय बँकेत असिस्टंट मॅनेजर पदासाठी नोकर भरती, जाणून घ्या अर्जप्रक्रियेसह महत्वाच्या तारखा)

जागा आणि पद:

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडकडून जम्मू आणि काश्मीरमध्ये उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक (यूएसबीआरएल) योजनेसाठी कॉन्ट्रॅक्टवर आधारित उमेदवारांची भरती केली जाणार आहे. यात सिनिअर टेक्निकल असिस्टंट(सिव्हिल) आणि ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट (सिव्हिल) या पदासाठी प्रत्येकी 7 जागा आहेत. यामध्ये ओबीसी साठी 5 आणि एसटी साठी 2 अशा जागा आहेत.  येथे पहा अधिकृत नोटिफिकेशन.

वेतन:

सिनिअर टेक्निकल असिस्टंट पदावर निवड झालेल्या उमेदवारास 35 हजार प्रति महिना तर ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट पदावर निवड झालेल्यांना 30 हजार रुपये प्रति महिना असे वेतन दिले जाणार आहे.

वयोमर्यादा:

सिनिअर टेक्निकल असिस्टंट पदासाठी उमेदवारांचे वय 1 सप्टेंबर 2021 रोजी 30 वर्षे तर ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट पदासाठी 25 वर्षे असणे गरजेचे आहे. एससी, एसटी आणि ओबीसी उमेदवारांसाठी वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

शैक्षणिक पात्रता:

या नोकरीत पात्र ठरण्यासाठी उमेदवारांकडे AICTE द्वारे मान्यताप्राप्त विद्यापिठातून 60 टक्के गुणांसह अभियांत्रिकी पदवी असणे आवश्यक आहे. याशिवाय कामाचा अनुभव असणे देखील गरजेचे आहे.

निवड प्रक्रीया:

मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड करण्यात येईल. 20 ते 22 सप्टेंबर या कालावधीत सिनिअर टेक्निकल असिस्टंट पदासाठी मुलाखती होतील. तर 23 ते 25 सप्टेंबर या कालावधीत ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट पदासाठी मुलाखती घेतल्या जातील.

इच्छुक आणि पात्र उमेदवार या संधीचा नक्कीच लाभ घेऊ शकतात. दरम्यान, यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी कोकण रेल्वेच्या वेबसाईटला भेट द्या.