IDBI Bank (Pic Credit - IDBI Bank Twitter)

IDBI Recruitment 2021: पदव्युत्तर झालेल्या उमेदवारांसाठी खुशखबर आहे. कारण आयडीबीआय बँकेत असिस्टंट मॅनेजर पदासाठी नोकर भरती केली जाणार आहे. एकूण 650 पदांवर योग्य उमेदवारांची निवड करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. या नोकर भरती संदर्भात अर्ज प्रक्रिया अद्याप सुरु असून अंतिम तारीख 22 ऑगस्ट 2021 दिली आहे. त्यामुळे आयडीबीआय बँकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. उमेदवारांची निवड लेखी परिक्षेच्या माध्यमातून केली जाणार आहे.(HDFC Bank ला RBI चा दिलासा; नवी Credit Cards देण्यासाठी 8 महिन्यांनी मिळाली मुभा)

अर्ज करण्याची सुरुवात 10 ऑगस्ट पासूनच झाली आहे. तर ऑनलाईन अर्ज करण्याच्या अंतिम तारेखपूर्वी उमेदवारांनी फॉर्म भरावा असे सांगण्यात आले आहे. अर्जाचे शुल्क जमा करण्याची तारीख सुद्धा 22 ऑगस्ट दिली गेली आहे. अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बँकेकडून या नोकर भरतीसाठी परीक्षेची तारीख जाहीर केली जाणार आहे.

अर्ज करणाऱ्या उमेदवाराने पदव्युत्तर शिक्षण घेतलेले असावे. तसेच जनरल कॅटेगरीतील उमेदवारांना कमीतकमी 60 टक्के गुण असणे आवश्यक आहे. एससी, एसटी आणि दिव्यांगांना 55 टक्के गुण अनिवार्य आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 21 वर्ष आणि अधिकाधिक 28 वर्ष असावे. वयाबद्दलच्या अटीसंदर्भातील अधिक माहितीसाठी तुम्हाला अधिकृत नोटिफिकेशन पहावे लागणार आहे.(UPSC Recruitment 2021: युपीएससीने असिस्टेंट कीपर, प्रिंसिपलसह अन्य पदांवर नोकर भरती, 3 सप्टेंबर पर्यंत करता येईल अर्ज)

जनरल, ओबीसी आणि ईडब्लूएस कॅटेगरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 1 हजार रुपये शुल्क भरावे लागणार आहे. तसेच अनुसूचित जातीजमाती आणि दिव्यांना 200 रुपये शुल्क द्यावा लागणार आहे. तुम्ही डेबिट, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगच्या मदतीने हे शुल्क भरू शकता. अधिकृत वेबसाइट https://www.idbibank.in येथे तुम्ही भेट देऊन अर्ज करु शकता. अर्ज नीट वाचून झाल्यानंतर तो भरावा. त्यात काही चूक झाल्यास तुमचा अर्ज रद्द केला जाऊ शकतो.