
UPSC Recruitment 2021: संघ लोक सेवा आयोगाने विविध पदांवर नोकर भरती करण्यासंदर्भात जाहीर केले आहे. त्यानुसार असिस्टंट कीपर, प्रिंसिपल, डेप्युटी डायरेक्टर आणि फिशरीज रिसर्ज इन्वेस्टिगेशन ऑफरच्या पदावर योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या नोकर भरती प्रक्रियेच्या माध्यमातून एकूण 155 रिक्त पदांवर उमेदवार निवडले जाणार आहेत. ज्यामध्ये 151 कर्मचारी राज्य बीमा निगम, श्रम आणि रोजगार मंत्रालयात उपनिर्देशकसाठी आहे. तर 2 पद भारतीय मानव विज्ञान सर्वेक्षणसाठी आहे. या व्यतिरिक्त मिनिस्ट्री ऑफ कल्चर मध्ये 1 असिस्टंट कीपरसाठी आहे.(नोकरदार वर्गासाठी महत्वाची बातमी! 15 दिवसात आटोपून घ्या 'हे' काम अन्यथा PF मधील पैसे अडकण्याची शक्यता)
उमेदवारांना सर्व पदांवर अर्ज करण्यासाठी https://upsc.gov.in/apply-online येथे भेट द्यावी. उमेदवारांनी लक्षात घ्यावे की, अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 सप्टेंबर आहे. अंतिम तारखेनंतर कोणाचेही अर्ज स्विकार केले जाणार नाही आहेत.
कर्मचारी राज्य बीमा निगम, श्रम, पशुपालन आणि डेअरी मंत्रालयात फिशरीज रिसर्ज इन्वेस्टीगेशन ऑफिसर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मत्स्य पालनात स्पेशलायजेशनसह झ्युऑलॉजी मध्ये पीजी डिग्री किंवा एमएससी किंवा इंडस्ट्रियल फिशरिज मध्ये एमएससी डिग्री असावी.(AIESL Recruitment 2021: एअर इंडियात नोकरीची संधी; 28 ऑगस्ट पर्यंत असा करा अर्ज)
डेप्युटी डायरेक्टरच्या पदावर अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी वय 35 वर्षापर्यंत असावे. तसेच असिस्टंट कीपरच्या पदावर अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 33 वर्ष, फिशरीज रिसर्ज इन्वेस्टीगेशन ऑफिसर पदासाठी 40 वर्ष असावे. या नोकर भरती संदर्भात अधिक माहिती हवी असेल तर त्यांनी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.