नोकरदार वर्गासाठी महत्वाची बातमी! 15 दिवसात आटोपून घ्या 'हे' काम अन्यथा PF मधील पैसे अडकण्याची शक्यता
EPFO (Photo Credits-Facebook)

जर तुम्ही नोकरी करत असाल तर ही तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. कारण कर्मचारी भविष्य निधी संगठन (EPFO) या महिन्यात आपल्या 6 कोटी सब्सक्राइबर्सच्या खात्यात EPF व्याज जमा करु शकतात. ईपीएफचे व्याज हे अशाच खात्यात येणार ज्यामध्ये युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) हे आधार कार्डला लिंक केलेले असेल. UAN ला आधार कार्डला लिंक करण्यासाठी नवी तारीख 1 सप्टेंबर 2021 दिली आहे. त्यामुळे जर तुम्ही 15 दिवसात हे काम केले नाही तर तुमच्या पीएफ खात्यातील पैसे अडकण्याची शक्यता आहे.

कर्मचारी भविष्य निधी संगठनने नियोक्त्यांना निर्देश दिले की, ECR ची परवानगी फक्त EPFO सदस्यांसाठी असून ज्यांचे खाते आधारला लिंक आहे. मात्र एखाद्याचे ईपीएफ खाते आधार क्रमांकाला लिंक नसल्यास ईपीएफ खात्यात नियोक्त्याचे योगदान जमा होणार नाही आहे.(Ban on Single Use Plastic Items: देशात एकेरी वापरातील प्लास्टिक वस्तूंवर 1 जुलै 2022 पासून बंदी)

EPFO ने 15 जून रोजी आधार आणि UAN लिंक करण्याची मुदत 3 महिन्यांनी वाढवली. आता त्याची नवीन मुदत 1 सप्टेंबर 2021 आहे. ईपीएफओने सांगितले आहे की जेव्हा जेव्हा व्याज जमा केले जाईल तेव्हा ते पूर्ण भरले जाईल. व्याजाचे नुकसान होणार नाही. EPFO लवकरच 8.5% टक्के EPF व्याज जमा करू शकते. सेवानिवृत्ती निधी नियामक मंडळाने आर्थिक वर्ष 2020-21 साठी ईपीएफ व्याजदर अपरिवर्तित ठेवले.

आधार क्रमांक UAN शी लिंक करण्यासाठी, तुम्हाला EPFO ​​पोर्टल epfindia.gov.in वर लॉग इन करावे लागेल. 'ई-केवायसी पोर्टल' आणि 'यूएएनशी आधार लिंक करा' त्यानंतर 'ऑनलाईन सेवा' या पर्यायावर क्लिक करा. तुमचा यूएएन नंबर आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर टाका.

नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल. त्यानंतर OTP आणि तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाका. भरल्यानंतर, 'सबमिट' बटणावर क्लिक करा. 'OTP Verify' पर्यायावर क्लिक करा. यानंतर, तुमच्या आधार तपशीलांची पडताळणी करण्यासाठी, तुमच्या आधार क्रमांकाशी जोडलेल्या मेलमध्ये तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर ओटीपी जनरेट करा.