AIESL Recruitment 2021: एअर इंडियात नोकरीची संधी; 28 ऑगस्ट पर्यंत असा करा अर्ज
Air India Flight (Photo Credits: ANI)

नोकरीच्या शोधात असणार्‍यांना आता एअर इंडियामध्ये (AIR INDIA) नोकरीची संधी आहे. नुकत्याच जारी करण्यात आलेल्या त्यांच्या नोटिफिकेशन मध्ये फिक्स टर्म साठी म्हणजेच विशिष्ट कालावधीसाठी कॉन्ट्रॅक्ट बेस वर ज्युनियर एक्झिक्युटिव्ह फायनान्स (Junior Executive -

Finance) आणि असिस्टंट सुपरवायजर अकाऊंट (Assistant Supervisor Accounts)  या पदांसाठी नोकरभरती जाहीर करण्यात आली आहे. हैदराबाद, कोलकाता, दिल्ली, नागपूर, मुंबई मध्ये ही नोकरभरती होणार आहे. 28 ऑगस्टला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत इच्छुक उमेदवार आपला अर्ज सादर करू शकणार आहेत. त्यासाठी जाहिरातीसोबतच दिलेला अर्जाचा विहीत नमूना भरून नवी दिल्लीच्या कार्यालयात तो पोहचणं आवश्यक आहे. नक्की वाचा: DRDO Recruitment: Junior Research Fellowships साठी होणार नोकरभरती; drdo.gov.in वर असा करा अर्ज.

असिस्टंट सुपरवायझर-अकाउंट्स या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा अन्य संस्थेतून कॉमर्स शाखेतून पदवी धर असावा. संबंधित कामाचा किमान १ वर्षाचा अनुभव असावा.वयोमर्यादा १ ऑगस्ट २०२१ पर्यंत 28 वर्षे पूर्ण असावीत. तर ज्युनियर एक्झिक्युटिव – फायनान्स – या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार चार्टर्ड अकाउंटंट (CA)किंवा कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट (CMA)ची इंटर परीक्षा किंवा फायनान्समध्ये पूर्णवेळ एमबीए डिग्री घेतलेला असावा. सोबतच संबंधित कामाचा किमान तीन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा १ ऑगस्ट २०२१ रोजी ३० वर्षे असणं गरजेचे आहे. इथे पहा अधिकृत नोटिफिकेशन.

दरम्यान ज्युनियर एक्झिक्युटिव फायनान्स या पदावर निवड झालेल्या उमेदवाराचा पगार 50 हजार असेल तर असिस्टंट सुपरवायझर-अकाउंट्स साठी निवड झालेल्याचा पगार 24 हजार असेल. दरम्यान या साठी मुलाखती घेतल्या जाणार आहेत. हा 5 वर्षांसाठीचा कॉन्ट्रॅक्ट असेल त्यानंतर काम पाहून 2 वर्ष वाढवून दिली जाऊ शकतात. अर्ज करताना उमेदवारंना दीड हजारांचा डिमांड ड्राफ्ट देखील बनवून द्यायचा आहे.