DRDO Recruitment: Junior Research Fellowships साठी होणार नोकरभरती; drdo.gov.in वर असा करा अर्ज
Job | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

DRDO अंतर्गत असलेल्या Centre For Airborne Systems कडून विविध कॅटेगरीज मध्ये ज्युनियर रिसर्च फेलोशीप साठी अर्ज मागवण्यात आले आहेत. 20 जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. Aerodynamics, Structural Design Analysis, Radar Engineering, Communication Engineering, Networking and Display Systems, Mission Computer, Thermal Management या क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे.

डीआरडीओ कडून करण्यात येणार्‍या या नोकरभरती मध्ये उमेदवारांचे गेट स्कोअर, डिग्री, पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री चे मार्क्स पाहिले जाणार आहेत. यानंतर शॉर्ट लिस्ट केलेल्या उमेदवारांना ऑनलाईन इंटरव्यू साठी बोलावले जाणार आहे. यानंतर निवड झालेल्यांची यादी DRDO ची वेबसाईट drdo.gov.in वर जाहीर केली जाणार आहे. MMRC Recruitment 2021: मेट्रो मध्ये इंजिनिअर्सना नोकरीची संधी 22 ऑगस्ट पर्यंत करा mmrcl.com वर रजिस्ट्रेशन.

अर्ज कसा कराल?

  • DRDO ची वेबसाईट drdo.gov.in ला भेट द्या.
  • होम पेज वर What's New या सेक्शनला भेट द्या.
  • अ‍ॅप्लिकेशन फॉर्म डाऊनलोड करा.
  • तो फॉर्म भरा.
  • सेल्फ अटेस्ट करून आवश्यक कागदपत्र अपलोड करा.
  •  jrf.rectt@cabs.drdo.in. या इमेल आयडीवर कागदापत्र पाठवा.

पात्रता निकष

व्हॅलिड गेट स्कोअर सह उमेदवार एम टेक, बीई, एमई, बी टेक असणं आवश्यक आहे. गेट 2020 आणि 2021 चे स्कोअर ग्राह्य धरले जाणार आहेत. निवड झालेल्याला दरमहा 31 हजार रूपये मिळणार आहेत.

दरम्यान उत्तम शैक्षणिक पात्रता असलेल्या तरूणांना संशोधन क्षेत्रामध्ये सहभागी करून घेण्यासाठी डीआरडीओ ही संधी देत आहे.