irctc | (Photo credit: archived, edited, symbolic images)

असंख्य प्रवाशांना रेल्वे तिकीट बुकींग करण्यासाठी आणि आयत्या वेळी ते रद्द करण्यासाठी कामी येणारे इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (Indian Railways Catering and Tourism Corporation) म्हणजेच IRCTCचे अधिकृत संकेतस्थळ irctc.co.in मर्यादित कालावधीसाठी बंद राहणार आहे. त्यामुळे IRCTC द्वारे केल्या जाणाऱ्या ऑनलाईन तिकीट बुकींग आणि ते रद्द करण्याच्या सुविधेला काही काळ स्थगिती देण्यात आली आहे. तांत्रिक दुरुस्तीसाठी संकेतस्थळ बंद ठेवण्यात येणार असल्याचे समजते.

6 मार्च 2019 रोजी मध्यरात्री 12 वाजलेपासून ते 7 मार्च 2019 च्या सायंकाळी 6 वाजेपर्यंत हे संकेतस्थळ बंद राहणार आहे. त्यामुळे तिकीट बुक अथवा बुक केलेले तिकीट रद्द करायचे असेल तर, प्रवाशांना थेट रेल्वे फलाटावर असलेल्या रेल्वे कार्यालयात प्रत्यक्ष जावे लागणार आहे. कार्यालयात ही प्रक्रिया नियमीतपणे सुरु असणार आहे.

आयआरसीटीसीने डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी नुकतेच IRCTC iPay लॉन्च केले आहे. या नव्या प्रणालीचा वापर करुन तुम्ही रेल्वे किंवा विमान प्रवासाचे तिकीट ऑनलाईन बुक करु शकता. अशा पद्धतीने तिकीट बुक करताना तुम्हाला प्रत्यक्ष कार्यालयात यायची मुळीच आवश्यकता असणार नाही. तुम्ही घरसबसल्याही तिकीट बुक करु शकता. नव्या प्रणालीने तिकीट बुक करताना प्रवाशांचा वेळ, पैसा आणि श्रम यांची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. हेच तिकीट बुक करण्यासाठी पूर्वी प्रत्यक्ष कार्यालयात जावे लागत असे. तसेच, तेथील रांगेमध्ये प्रवाशांचा बराच वेळ वाया जात असे. नव्या प्रणालीने सर्वच गोष्टींना फाटा बसला असून, तिकीट बुकींग सेवा अत्यंत सुलभ झाली आहे. (हेही वाचा, प्रवाशांना रेल्वे आरक्षण यादी आता ऑनलाईन पाहता येणार)

दरम्यान, रल्वेने नुकतेच Drishti dashboard लॉन्च केले आहे. ज्यामुळे पारदर्शक व्यवहारासोबतच उत्तरदायीत्वालाही चालना मिळणार आहे. या पोर्टलच्या माध्यमांमधून रेल्वे प्रवासी आणि पोर्टलच्या वापरकर्त्यांना एकाच वेळी विविध रेल्वे गाड्यांची आणि ठिकाणांची माहिती मिळणे सुलभ होणार आहे. रल्वे वेळापत्रक आणि इतर बाबींची आवश्यक ती सर्व माहिती Drishti dashboardमुळे प्रवाशांना कोणत्याही ठिकाणी कोणत्याही वेळी उपलब्ध असणार आहे. रेल्वे प्रवाशी या पोर्टलद्वारे आपली PNR चौकशी, तक्रार आणि सेवांबाबत अभिप्राय नोंदवू शकतात.