रेल्वे स्थानकात सध्या आयआरसीटीसी कडून शुद्ध पाणी अवघ्या दोन रुपयात विकले जाते. त्यासाठी वॉटर व्हेडिंग मशीन स्थानकात उभारण्यात आल्या आहेत. सुरुवातीपासून या उपक्रमाला प्रवाशांकडून उत्तम प्रतिसाद दिला जात आहे. परंतु ठेकेदारांना शुद्ध पाण्याची सेवा महागडी वाटत आहेत. तर आयआरसीटीसीकडून एका पत्रात असे लिहिण्यात आले आहे की, 23 स्थानकातील ही सेवा बंद करण्यात आली आहे. यामध्ये खासकरुन मुंबई उपनगरामधील रेल्वे स्थानके आहेत.
आयआरसीटीसी आय टेक वॉटर एटीएमच्या माध्यमातून प्रवाशांना पाण्याची सोय करुन देण्यात आली. मात्र यासाठी लागणारे पाणी आणि विजेची थकबाकी आहेत. एवढेच नाही तर प्रवाशांनी याबाबत तक्रार केल्यानंतर ही स्विकारण्यात येणाऱ्या दंडाची वसूली सुद्धा केली नाही आहे. आय टेक वॉटर यांच्याद्वारे जवळजवळ 39 ठिकाणी अशुद्ध पाण्याचा पुरवठा प्रवाशांना केला जात होता. परिणामी ही सेवा आता बंद करण्यात आली आहे.
याबाबत रेल्वे प्रशासनाला सुद्धा कळवण्यात आले आहे. त्यामुळे ही कंपनी जो पर्यंत थकबाकी भरत नाही तोपर्यंत त्यांना मशीन किंवा त्याचा कोणताही पार्ट ते घेऊन जाऊ शकत नाहीत असे स्पष्ट केले आहे. तर आता जो पर्यंत ही थकबाकी भरली जात नाही तो पर्यंत शुद्ध पाण्याचा पुरवठा करणे अशक्य आहे.(प्रवाशांच्या सोयीसाठी IRCTC ने सुरु केली नवी 'iPay' पेमेंट सुविधा; ही आहे खासियत)
तर रेल्वेत विक्री करण्यात येणाऱ्या अन्नपदार्थांसाठी ठराविक दर प्रवाशांकडून घेण्यात येतात. मात्र आता रेल्वेमध्ये नाश्ता ते जेवणाच्या किंमतीत अधिक वाढ होणार असल्याने सामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री बसणार आहे. तर रेल्वे बोर्डाच्या पर्यटन आणि अन्नपदार्थ विभागाने निर्देशन देत जाहीर करण्यात आलेल्या एका पत्रकानुसार राजधानी, शताब्दी आणि दुरांतो एक्सप्रेसमध्ये चहा, नाश्ता आणि जेवण यांच्या दरात वाढ करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या रेल्वेची तिकिट घेतल्यास तेथेच प्रवाशाला नाश्ता पासून ते जेवणाच्या पदार्थांचे पैसे द्यावे लागतात.