डिजिटल व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी इंडियन रेल अँड टूरिझम कॉरपोरेशन (IRCTC) ने बहुप्रतिक्षित अॅग्रीगेटर सिस्टम IRCTC iPay लॉन्च केले. यामुळे प्रवाशांना ऑनलाईन व्यवहार करणे अधिक सोपे होईल. तसंच रेल्वे प्रवाशांना चांगले डिजिटल अनुभव मिळतील आणि सुधारित ऑनलाइन डिजिटल पेमेंट सुविधा उपलब्ध होतील.
# IRCTC iPay च्या लॉन्च मुळे प्रवाशांना व्यवहारासाठी कोणत्याही वेगळ्या प्लॅटफॉर्मची आवश्यकता भासणार नाही. IRCTC iPay वर तुम्ही क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड आणि युनीफाईड पेमेंट इंटरफेस, इंटरनॅशनल कार्डच्या माध्यमातून पेमेंट करण्याची संधी मिळेल.
# यावरुन पेमेंट करण्यासाठी प्रिपेड कार्ड कम वॉलेट आणि ऑटो डेबिट चा पर्यायही उपलब्ध असेल.
# या पेमेंटच्या नव्या सुविधेवर IRCTC जवळ संपूर्ण नियंत्रण असेल. कारण बँक, कार्ड नेटवर्क आणि अन्य पर्यायांशी याचा थेट संबंध असेल.
# या नव्या सुविधेमुळे IRCTC आणि बँकेमधील अंतर कमी होण्यास मदत होईल आणि यामुळे पेमेंट करताना येणारा अडथळा दूर होण्यास मदत होईल.
# त्याचबरोबर पेमेंट करताना काही अडथळा आल्यास किंवा पेमेंट यशस्वीरीत्या होऊ शकले नाही तर IRCTC इतर मधल्या सुत्रांशी संपर्क करण्याऐवजी थेट बँकेशी संपर्क करेल. यामुळे पेमेंट प्रक्रीया पूर्ण होण्यासाठी लागणारा वेळ वाचेल.
IRCTC ने उचललेल्या या पाऊलावर वेबसाईटच्या माध्यमातून दुसऱ्या पेमेंट एग्रीगेटरवरुन ट्रान्सजेक्शनची व्यवस्था सुरु राहील. त्यामुळे तिकीट बुकींग करणे प्रवाशांसाठी सोयीचे होईल.