उन्हाळी सुट्टी सुरु झाली आहे. त्यादरम्यान लोक सुट्टीनिमित्त बाहेर फिरायला जाण्यासाठी वेळ काढतात. तसेच रेल्वेने जर तुम्ही प्रवास करत असल्यास तुम्हाला उन्हाळ्याच्या सुट्टीत रेल्वेची तिकिट आरक्षित मिळत नाही. त्यामुळे आता आयआरसीटीसीने (IRCTC) एक नवीन सुविधा रेल्वे प्रवाशांसाठी सुरु केली आहे. त्यामध्ये प्रवाशांना बोर्डिंग स्टेशन बदलण्याची सुविधा सुरु करण्यात आली आहे. तर येत्या 1 मे पासून प्रवाशांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.
यामुळे प्रवाश्याने रेल्वेचे तिकिट घेतल्यानंतर कोणत्याही कारणास्तव त्याला बोर्डिंग स्टेशन बदलायचे झाल्यास ते आता या नव्या सुविधेमुळे उपलब्ध होणार आहे. तर ट्रेनच्या वेळेच्या 24 तास अगोदर तुम्हाला बोर्डिंग स्टेशन बदलता येणार आहे. फक्त ही सुविधा ऑनलाईन पद्धतीने तिकिट बुकिंग करणाऱ्या प्रवाशांना मिळणार आहे. मात्र रेल्वेच्या तिकिट काऊंटवर वरुन काढण्यात आलेल्या तिकिटासाठी ही सुविधा लागू करण्यात आलेली नाही.(IRCTC ची 'Book Now, Pay Later' नवी सुविधा; कसा घ्याल या सुविधेचा लाभ?)
अशा प्रकारे या सुविधेचा लाभ घ्या:
या सुविधेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना तिकिट काऊंटरवर जाण्याची आवश्यकता नाही. तुम्ही हे काम माहिती कक्ष क्रमांक 139 वर फोन करुन सुद्धा मिळवू शकता. तसेच अधिक माहिती हवी असल्यास तुम्हाला ती irctc.co.in वर मिळणार आहे.
परंतु एकदा बोर्डिंड स्टेशनमध्ये बदल केल्यास त्यानंतर पुन्हा अगोदरच्या बोर्डिंग स्टेशनसाठी तुम्ही प्रवास करु शकत नाही. त्यामुळे जर व्यक्तीने अशा प्रकारे प्रवास केल्यास त्याच्याकडून त्या दोन्ही बोर्डिंग स्टेशनच्या मधील भाडे द्यावे लागणार आहे. बोर्डिंग स्टेशन फक्त एकदाच बदलता येणार आहे. तर तत्काळ तिकिट आणि विकल्प ऑप्शन निवडून पीएनआर क्रमांकासाठी हा नियम लागू नसणार आहे.