IRCTC | Image Used For Representational Purpose Only | (Photo Credits: File Photo)

प्रवाशांसाठी IRCTC ने नवी सुविधा सुरु केली आहे. Book Now, Pay Later ही सर्व्हीस तात्काळ तिकीटांसाठी सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे आता रेल्वेची तिकीटे उधारीवर काढता येणे शक्य होणार आहे. Book Now, Pay Later म्हणजे आधी आरक्षित करा, नंतर पैसे द्या अशी ही सुविधा आहे. याचा उपयोग तुम्हाला ऑनलाईन तिकीट बुकींग सेवेसाठी होणार आहे. यापूर्वी तिकीट बुक झाल्यानंतर पैसे भरताना काही समस्या आल्यास बुकींग कॅन्सल होत होते. या सुविधेमुळे या समस्येपासून तुमची सुटका होणार आहे.

Book Now, Pay Later या सेवेचा लाभ कसा घ्याल?

सर्वप्रथम IRCTC च्या वेबसाईटवर जावून तिकीट बुक करताना पेमेंट ऑप्शनवर जा. तिथे पेमेंट कसे करणार, असे ऑप्शन्स येतात. तेथे तुम्हाला नवा ऑप्शन पे लॅटर (Pay Later) दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर ePayLater वेबसाईटवर रिडायरेक्ट केले जाईल. त्यानंतर तुमच्या अकाऊंटवर लॉगईन केल्यावर लगेचच तिकीट आरक्षित होईल.

या तिकीटांचे रक्कम 14 दिवसांत चुकती करावी लागेल. विशेष म्हणजे यावर व्याजही आकारले जाणार आहे. सध्या ePayLater या सुविधेचा तुम्ही मोफत लाभ घेऊ शकता. मात्र काही कालावधीनंतर यावर व्याज आकारण्यात येईल.

ePayLater चे अॅपही उपलब्ध असून त्यावर तुम्ही साईन इन करुन ठेवू शकता. तसंच तिकीट उधारीवर बुक करण्यासाठी एक मर्यादा सुरुवातीला असेल. मात्र तिकीटाचे पैसे वेळेत चुकते केल्यानंतर कालांतराने ही मर्यादा वाढेल. म्हणजेच तुमचे क्रेडिट लिमिट वाढेल.