भारतीय रेल्वेने प्रवास करणार्यांसाठी आता IRCTC ने एक नवी सुविधा दिली आहे. ज्यामध्ये व्हॉट्सअॅप वरच आता पीएनआर स्टेटस आणि रिअल टाईम ट्रेन जर्नी चे तपशील पाहता येणार आहेत. हे नवं फीचर मुंबई स्थित स्टार्ट अप Railofy कडून देण्यात आलं आहे. यामुळे आयआरसीटीसी च्या प्रवाशांना व्हॉट्सअॅप वर एका टॅप वर ट्रेनचं स्टेटस समजू शकणार आहे. त्यासाठी आता मोबाईल मध्ये अजून वेगवेगळी अॅप्स डाऊनलोड करून ठेवण्याची गरज नाही.
व्हॉट्सअॅपचा चॅटबोट हा प्रवाशांना पीएनआर स्टेटस, लाईव्ह ट्रेन स्टेटस, मागील स्टेशनचा तपशील, पुढील स्टेशनचा तपशील आणि अन्य रेल्वे प्रवासाचे तपशील देणार आहेत. याकरिता 10 अंकी पीएनआर नंबर व्हॉट्सअॅप चॅटबोटला द्यावा लागणार आहे. लाईव्ह ट्रेनचं स्टेटस समजून घेण्यासाठी हेल्पलाईन नंबर 139 देखील डाईल करून माहिती घेता येईल. नक्की वाचा: ज्येष्ठांसाठी रेल्वे प्रवासात हमखास लोअर बर्थ चं तिकिट कसं काढायचं? IRCTC नेच केला थेट खुलासा .
ट्रेन प्रवासासाठी व्हॉट्सअॅप चॅटबोटची कशी घ्याल मदत?
- Railofy चा व्हॉट्सअॅप चॅटबोट नंबर +91-9881193322 हा फोन कॉन्टॅक्ट्स मध्ये सेव्ह करा.
- आता तुमचा व्हॉट्सअॅप अपडेट करा.
- व्हॉट्सअॅप ओपन करून कॉन्टॅक्ट लिस्ट रिफ्रेश करा.
- Railofy शोधून चॅट विंडो ओपन करा.
- तुमचा 10 अंकी पीएनआर नंबर त्याला पाठवा.
- Railofy चा चॅटबोट आता ट्रेन बाबत काही अपडेट तुम्हांला पाठवेल.
- प्रवास सुरू होण्यापूर्वी देखील तुम्ही हा नंबर पाठवून ट्रेनचे अपडेट घेऊ शकतात.
आयआरसीटीसी च्या प्रवाशांना आता Zoop अॅप वर देखील जेवण ऑर्डर करू शकाल. ऑनलाईन ऑर्डर केलेले हे पदार्थ तुम्हांला थेट सीट वर उपलब्ध होणार आहेत. यासाठी +91 7042062070व्हॉट्सअॅप नंबर सेव्ह ठेवा.