प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

उन्हाळी सुट्टीसाठी प्रवासी खासकरुन बाहेर फिरायला जाण्याचा बेत करतात. तसेच रेल्वे तिकिट बुकींसाठी उन्हाळी सुट्टीसाठी उन्हाळ्यापूर्वीच रिझर्व्हेशन केले जाते. परंतु रेल्वे प्रशासनाने आता सीट रिझर्व्हेशनसाठी काही नवीन नियम लागू केले आहेत.

त्याचसोबत उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी भारतीय रेल्वेप्रशासनाने खास समर स्पेशल ट्रेन्ससुद्धा सुरु करणार आहेत. तसेच तिकिट बुकिंग ते तिकिट रद्द करण्यासाठी अधिक माहिती आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. तत्पूर्वी सीट रिझर्व्हेशनसाठी हे लक्षात ठेवा.(हेही वाचा-रेल्वे तिकिट रद्द केल्यास मिळणार रिफंड, पण 'हे' नियम लक्षात ठेवा)

- रेल्वेने महिलांसाठी जास्तीत जास्त जागा राखीव ठेवल्या आहेत. तर जेष्ठ नागरिकांसाठी खालच्या सीट्स 4 आरक्षित असणार आहेत.

-मेल आणि एक्सप्रेस ट्रेनमध्ये महिलांसाठी 6 स्लिपर बर्थ असणार असून गरीब रथ एक्सप्रेसमध्ये 3AC वर्गात 6 बर्थसीट आरक्षित असणार आहेत.

-राजधानी, दुरांतो आणि वातानुकूलित एक्सप्रेसमध्ये महिलांसाठी 6 बर्थ कोटा वाढवण्यात आला आहे. त्यामुळे जेष्ठ महिला, गरोदर महिला यांना याचा फायदा होणार आहे.

-तसेच जेष्ठ महिला आणि जेष्ठ नागरिकांसाठी दुरांतो आणि राजधानी एक्सप्रेसमध्ये 4 सीट्स आरक्षित असणार आहेत. (हेही वाचा-प्रवाशांच्या सोयीसाठी IRCTC ने सुरु केली नवी 'iPay' पेमेंट सुविधा; ही आहे खासियत)

तसेच आयआरसीटीसी यांच्या वेबसाईटनुसार जर ट्रेनचे तिकिट 48 तासांच्या आधी आरक्षित म्हणून देण्यात येत असल्यास तुम्हाला ते रद्द करायचे झाल्यास एसी प्रथम श्रेणी/एग्झिक्युटिव्ह क्लाससाठी 240 रुपये प्रति प्रवासी असा रिफंड देण्यात येतो. तर एसी 2 टियरसाठी 200 रुपये आणि एसी 3 टियर/एसी चेयर कार/एसी 3 इकोनॉमीसाठी 180 रुपये रिफंड देण्यात येतात.