PAN Card हरवल्यास या सोप्या पद्धतीने मिळवा e-Pan; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रीया
पॅन कार्ड (Photo Credits: File Photo)

आवश्यक ओळखपत्रांपैकी एक पॅन कार्ड (PAN Card) आहे. सरकारी कामांपासून अगदी खाजगी कामांपर्यंत सगळ्यासाठी पॅन कार्ड गरजेचे झाले आहे. बँक अकाऊंट ओपन करण्यासाठी, क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड घेण्यासाठी किंवा आयटीआर फाईल करण्यासाठी सगळीकडे पॅन कार्ड दाखवणे अनिवार्य झाले आहे. त्यामुळे पॅन कार्ड हरवल्यास नवीन कार्ड येईपर्यंत अनेक कामे रखडून राहतात. परंतु, आता टेन्शन घेण्याचे कारण नाही. कारण ई-पॅन (e-Pan) कार्ड तुम्ही इन्कम टॅक्सच्या कोणत्याही वेबसाईटवरुन अगदी सहज डाऊनलोड करु शकता. जाणून घेऊया ई-पॅन कार्ड डाऊनलोड करण्याची संपूर्ण प्रक्रीया...

ई-पॅन डाऊनलोड करण्यासाठी सोप्या स्टेप्स:

# सर्वप्रथम इन्कम टॅक्सची वेबसाईट https://www.incometax.gov.in/iec/foportal वर लॉगईन करा.

# 'Instant E PAN' वर क्लिक करा.

# त्यानंतर 'New E PAN'वर क्लिक करा.

# तिथे तुमचा पॅन नंबर टाईप करा.

# पॅन नंबर लक्षात नसेल तर आधार नंबर इंटर करा.

# तिथे अनेक नियम आणि अटी दिल्या असतील त्या काळजीपूर्वक वाचा आणि मग 'Accept' वर क्लिक करा.

# त्यानंतर तुमच्या रजिस्ट्रर मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल. तो एंटर करा.

# दिलेले डिटेल्स वाचल्यानंतर 'Confirm'वर क्लिक करा.

# तुमच्या ईमेल आयडीवर पॅन कार्ड पीडीएफ फॉर्मेटमध्ये येईल.

# ते e-pan तुम्ही डाऊनलोड करु शकता.

पॅन-आधार लिंक असणे गरजेचे: 

तुम्हाला जर तुमचा पॅन नंबर लक्षात नसेल तर तुम्ही आधार कार्डच्या मदतीने ई-पॅन कार्ड डाऊनलोड करु शकता. परंतु, यासाठी तुमचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक असणे अनिवार्य आहे. पॅन-आधार लिंक नसल्यास ई-पॅन डाऊनलोड करता येणार नाही. (How To Check PAN Card is Fake or Real: पॅन कार्ड ची सत्यता कशी तपासाल? जाणून घ्या सोपी पद्धत)

अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने अगदी झटपट तुम्ही ई-पॅन मिळवू शकता. त्यामुळे पॅन कार्ड संबंधित कामांचा खोळंबाही होणार नाही.