Income Tax | Representational Image | (Photo Credits: File Image)

करदात्यांसाठी यंदा देखील आयकर विभागाकडून इन्कम टॅक्स रिटर्न (Income Tax Return) भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. यावर्षी 2020-21 या आर्थिक वर्षाचा टॅक्स रिटर्न करदाते 30 सप्टेंबर पर्यंत भरू शकणार आहेत. आता आयकर विभागाने करदात्यांसाठी नवे पोर्टल लॉन्च केले आहे. त्यामध्ये काहींना अडचणी येत असल्याने अर्थ मंत्रालयाने 30 सप्टेंबर पर्यंत ई- फाईलिंगसाठी मुदतवाढ दिली आहे. www.incometax.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर यंदाचा इन्कम टॅक्स रिटर्न भरता येणार आहे. नक्की वाचा: New Income Tax E-Filing Portal बाबत जाणून घ्या काही खास गोष्टी.

आयकर विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, 'फॉर्म नंबर 3 मध्ये बदल करण्यात आणि त्याला मिळवण्यात येत असलेल्या अडचणी पाहता करदात्यांना मुदतवाढ दिली जात आहे. 'विवाद से विश्वास अ‍ॅक्ट' अंतर्गत पैसे भरण्यासाठी ही पूर्वअट आहे.

नव्या ई फाईलिंग पोर्टल मध्ये ITR कसा फाईल कराल?

  • आयटीआर पोर्टल www.incometax.gov.in ला भेट द्या. पॅन सोबतच आता नव्या पोर्टलला आधार आणि TAN देखील जोडलेले असेल.
  • ई फाईल टॅब मध्ये इन्कम टॅक्स रिटर्न वर क्लिक करा. त्यानंतर 'फाईल इन्कम टॅक्स रिटर्न' वर क्लिक करा.
  • असेसमेंट इयर निवडा.
  • त्यानंतर आयटीआर फाईल करण्यासाठी मोड निवडा. ऑनलाईन पर्यायाची शिफारस केलेली असते.
  • start filing new ITR या पर्यायावर क्लिक करा.
  • individual, HUF आणि others असे तीन पर्याय दिसतील त्यापैकी individual निवडा.
  • त्यानंतर आयटीआर टाईप निवडा.
  • आयटीआर फाईल करण्याचं कारण निवडा त्यानंतर विचारलेली माहिती भरा.
  • त्यानंतर काहींना शुल्क भरण्यासाठी विचारलं जाईल.
  • यानंतर तुमचा आयटीआर प्रिव्ह्यू पाहून तो सबमीट करू शकता.
  • व्हेरिफिकेशन साठी प्रोसिड वर क्लिक करा.
  • त्यानंतर व्हेरिफिकेशन मोड निवडा.
  • आयकर विभागाकडून तुम्हांला डिजिटल साईनचा देखील पर्याय दिला जाईल. तुम्ही हा पर्याय निवडला असेल तर डिजितल सिग्नेचर द्यावी लागेल. इथे आधार सिग्नेचर अपलोड करण्याचाही पर्याय असेल.
  • डिजिटली साईन नसेल तर व्हेरिफाईंग साठी EVC/OTP सबमीट करा.

दरम्यान अधिकचा इंटरेस्ट भरून करदाते 31 ऑक्टोबर पर्यंतदेखील ई फाईलिंग करू शकतात. इंफोसिस कडून नवं वेब पोर्टल विकसित करण्यात आले आहे. त्यामुळे त्याच्याशी निगडीत तांत्रिक त्रृटी आणि गैरसोयीची अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दखल घेऊन सीईओ सोबत बातचीत केल्याचं म्हटलं आहे.