Mukesh Ambani's Reliance Makes History: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मालकीची रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (Reliance Industries Limited) ने फॉर्च्यून ग्लोबल लिस्ट (Fortune Global List) मध्ये तब्बल 21 वर्षे आपला दबदबा कायम ठेवला आहे. रिलायन्स कंपनी फॉर्च्यून ग्लोबल 500 यादीत 86 व्या स्थानावर पोहोचली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने गेल्या तीन वर्षांत लक्षणीय प्रगती केली असून कंपनीने या यादीत 69 स्थानांची झेप घेतली आहे. रिलायन्सने गेल्या 21 वर्षांपासून या फॉर्च्युन ग्लोबल लिस्टमध्ये सतत स्थान मिळवून पराक्रम गाजवला आहे. आतापर्यंत कोणतीही भारतीय कंपनी या यादीत इतके दिवस टिकू शकलेली नाही.
फॉर्च्युननुसार, रिलायन्सची कमाई 108877 दशलक्ष डॉलर्स इतकी नोंदवली गेली. कंपनीचा नफा 1.3 टक्क्यांनी वाढून 8,412 दशलक्ष डॉलर इतका झाला आहे. फॉर्च्यून ग्लोबल 500 यादीत वॉलमार्ट, ॲमेझॉन आणि स्टेट ग्रिड पहिल्या तीन स्थानांवर आहेत. याशिवाय ऍपल, टोयोटा मोटर्स, अल्फाबेट, सॅमसंग आणि मेटा प्लॅटफॉर्म सारख्या काही मोठ्या कंपन्या पहिल्या 100 मध्ये सामील आहेत. (हेही वाचा -Satellite Internet in India: लवकरच Mukesh Ambani भारतात सुरु करणार सॅटेलाइट इंटरनेट सेवा; Jio Platforms ला मिळाली भारतीय अंतराळ नियामकाकडून मंजुरी)
दरम्यान, यंदा फॉर्च्युन क्रमवारीत नऊ भारतीय कंपन्यांचा समावेश करण्यात आला आहे. यातील पाच कंपन्या सार्वजनिक क्षेत्रातील आहेत. भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC), 2024 च्या यादीत 12 स्थानांनी वाढून 95 व्या स्थानावर आहे. याशिवाय, सार्वजनिक क्षेत्रातील मोठी कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC) 22 स्थानांनी घसरून 116 व्या स्थानावर आली आहे. (हेही वाचा - Mukesh Ambani : अंबानी की अदानी? कुणाची मुले आहेत जास्त श्रीमंत, फोर्ब्सची आकडेवारी काय सांगते?)
तथापी, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने 178 व्या स्थानावर झेप घेतली आहे. फॉर्च्युन क्रमवारील भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) आणि ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ओएनजीसी) अनुक्रमे 22 आणि 25 स्थानांनी घसरून 258 व्या आणि 180 व्या स्थानावर आहेत. (हेही वाचा: Davos World Economic Forum: अदानी समूहाचे संस्थापक Gautam Adani यांची महाराष्ट्र दालनात भेट; CM Eknath Shinde यांच्यासोबत केली गुंतवणुकीच्या संधींवर चर्चा)
The 2024 #Global500 is here.
The corporations on our annual list of the world’s 500 largest companies posted aggregate revenues of $41 trillion in 2023. https://t.co/Vn5k9CNumA
— FORTUNE (@FortuneMagazine) August 5, 2024
फॉर्च्यून ग्लोबल 500 यादी -
फॉर्च्यून ग्लोबल 500 ही वार्षिक रँकिंग आहे, जी जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांची त्यांच्या एकूण कमाईवर आधारित यादी तयार करते. फॉर्च्युन या अमेरिकन मासिकाने ही यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेची स्थिती आणि प्रमुख कंपन्यांच्या कामगिरीची स्थिती समजते.