Davos World Economic Forum: दावोस येथे जागतिक आर्थिक परिषदेच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील औद्योगिक गुंतवणुकीच्या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. तसेच विविध देशांतील शिष्टमंडळांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन महाराष्ट्रात गुंतवणुकीच्या संधीबाबत चर्चा केली. या सोबतच अदानी समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष गौतम अदानी यांनी आज महाराष्ट्र दालनात भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अदानी यांच्यात महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा क्षेत्रात गुंतवणुकीच्या संधी आदी विषयांवर सविस्तर चर्चा झाली. याआधी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले होते की, महाराष्ट्रात परकीय गुंतवणूक आली पाहिजे, महाराष्ट्राचे ब्रॅण्डिंग झाले पाहिजे, यासाठी दावोस येथे चांगली संधी आहे. (हेही वाचा: Mumbai Marathon 2024: मुंबई मॅरेथॉनचा निधी उभारणीचा विक्रम, 267 स्वयंसेवी संस्थांनी जमवले 58 कोटी रुपये)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)