प्रातिनिधिक प्रतिमा (संग्रहित संपादित प्रतिमा)

दिवाळीनंतर लगेचच लग्नाचा हंगाम (Wedding Season) सुरू होईल. या काळात एकाच मुहूर्तावर दररोज अनेक विवाहसोहळे पार पडतात. वेगवेगळ्या ठिकाणी मांडव घातला जातो, वरात येते, मोठ्या धूमधडाक्यात मुलगी सासरी जाते. मात्र आता हे तितके सोपे राहिले नाही. जर तुम्हीही लग्न करणार असाल किंवा तुमच्या घरात कोणी लग्न करत असेल तर वेळीच जागे व्हा. सरकारने आता लग्नासाठीही काही कठोर नियम केले आहेत. तुम्ही लग्नाच्या वेळी या 6 नियमांची काळजी घ्या, अन्यथा वधूला सासरच्याऐवजी तुरूंगात जावे लागण्याची शक्यता आहे.

फायरिंग -

केवळ लग्नच नव्हे तर इतर प्रसंगीही सरकारने हवेत गोळीबार करण्यास पूर्णपणे बंदी घातली आहे. काही लग्न समारंभात अशी हवेत गोळीबार करण्याची प्रथा आहे मात्र त्यामुळे दुर्घटना निर्माण होऊ शकते. त्यामुळे सरकारने याबाबत कठोर कायदा केला आहे. आता पोलिसांकडून परवानगी न घेता केलेल्या फायरिंगमुळे मृत्यू किंवा कोणतीही इजा झाल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.

प्लास्टिक बंदी –

सरकारने 2 ऑक्टोबरपासून सर्वत्र प्लास्टिक बंदी केली आहे. त्यामुळे तुम्ही लग्नकार्यात या गोष्टीची काळजी घ्या. समारंभात किंवा कोणत्याही ठिकाणी प्लास्टिक आढळले तर दंड होऊ शकतो.

रोड जाम -

लग्नात रस्त्यावर नृत्य करत, गात निघालेल्या वरातीमुळे जर का रोड जाम झाला आणि ट्राफिकची समस्या निर्माण झाली तर तुमच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाग्नावेळी वरात काढा मात्र ट्राफिक जाम होणार नाही याची काळजीही घ्या.

आतिषबाजी बंद - 

हिवाळ्याच्या या हंगामात वायू प्रदूषणाचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढते. विशेषत: दिल्ली-एनसीआरमध्ये या वेळी श्वास घेणेही अवघड होते. ही परिस्थिती लक्षात घेता सरकारने लग्नाच्या कार्यक्रमात फटाके वाजवण्यास बंदी घातली आहे. जर फटके वाजलेच आणि कोणी तक्रार केली तर, गुन्हा नोंदविला जाऊ शकतो.

वरात 100 मीटर चालेल –

वरातीमुळे ट्राफिकची समस्या निर्माण होण्याची बरीच शक्यता असते. मोठ मोठ्या शहरांत ही परिस्थिती उद्भवण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे सरकारने वरात किती लांब जाईल याचा नियम बनवला आहे. या नियमानुसार लग्न जिथे होत आहे त्या जागेपासून 100 मीटर लांबीपासून वरात निघू शकते.

डीजेचा आवाज वाढणार नाही -

रात्री 10 नंतर डीजे वाजविण्यावर आधीपासूनच बंदी आहे, या नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे अनेक लोकांना शिक्षा झाली आहे.  आता सरकारने या नियामामध्ये अजून एक नियम जोडला आहे. आता डीजेच्या आवाजावरही नियंत्रण असणे गरजेचे असणार आहे. डीजे जोरात आवाजात वाजवू नये अशा नियमात आणखी एक नियम जोडला आहे. हा नियम मोडला तर तुम्हाला जेलची हवा खावी लागू शकते.