Sonu Sood (PC - Facebook)

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) मागील वर्षभरापासून कोविड संकटकाळात मजूर, बेरोजगार लोकांना मदत करताना दिसला आहे. कोविड 19 (Covid 19) संकटात त्याने अनेकांची खाण्या-पिण्याची सोय, देशा-परदेशातून मूळ गावी परतण्याची सोय करून दिली. शेतकर्‍यांना ट्रॅक्टर असो किंवा विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लाससाठी मोबाईल उपलब्ध करून देण्यापर्यंतची मदत त्याने केली आहे. आता देश जरा कोरोना संकटात सावरण्यास सुरूवात झाली असताना सोनूने देशात 1 लाख बेरोजगारांना नोकर्‍या उपलब्ध करून देणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. दरम्यान यामध्ये तुम्हांलाही सहभागी व्हायचं असेल आणि नोकरी हवी असेल तर तुम्हांला गुड वर्कर अ‍ॅपच्या (GoodWorker App) मदतीने अर्ज दाखल करावा लागणार आहे. सोनू सुदने ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. बॉलिवूड अभिनेता Sonu Sood देणार 1 लाख लोकांना नोकरी; 10 कोटी तरुणाचं भविष्य बदलवण्याचा केला दावा, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्लान.

गुडवर्कर हे एक जॉब अ‍ॅप्लिकेशन आहे. या अ‍ॅप मध्ये भारतातील प्रवासी मजूरांना नोकरी देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. हे अ‍ॅप गरजवंतांना मदत करण्यासाठी बनवण्यात आले आहे. गुड वर्करचं मिशन असं आहे की ते लाखो प्रवासी कामगारांना जॉब मिळवण्यासाठी, जॉबच्या लिंक्स इच्छुक उमेदवारांपर्यंत पोहचवण्यासाठी काम करणार आहे. दरम्यान असा दावा करण्यात आला आहे की ते एक वेरिफाईड अ‍ॅप आहे. म्हणजेच याद्वारा नोकरीच्या नावाखाली फसवणूकीची शक्यता कमी आहे.

कसा कराल अर्ज?

गूगल प्ले स्टोअर वरून गूडवर्कर अ‍ॅप डाऊनलोड करा.

या अ‍ॅप वर बायोडाटा बनवा आणि तो शेअर करता येणार आहे. यामध्ये भारतीय भाषेत बायोडाटा तयार केला असेल तर त्याचं इंग्रजीत भाषांतर करून तो कंपन्यांना पाठवला जाणार आहे.

जॉब मॅचिंग टूलच्या माध्यमातून इच्छूक उमेदवारांचा अर्ज संबंधित व्यक्तीकडे पोहचवला जाणार आहे.

तुम्ही ज्या भागात राहता तेथे नोकरीच्या शोधात असाल तर तशी माहिती, अलर्ट्स दिले जाणार आहेत.

एखाद्या कंपनीने नोकरभरतीची जाहिरात दिली असेल तर ती देखील दाखवली जाणार आहे. दरम्यान राहण्याचं ठिकाण आणि पात्रता यांच्यावरून ही माहिती पुढे दिली जाईल.

मुलाखतीसाठी निवड झाल्यास त्याचे देखील सारे अपडेट्स अ‍ॅपवर मिळणार आहे.

दरम्यान यावरून तुम्हांला नोकरी मिळाल्यास त्याचे सर्टीफिकेट देखील मिळणार आहे म्हणजे भविष्यात त्याची पुढील नोकरी मिळण्यासाठी देखील फायदा होऊ शकतो.

दरम्यान हे अ‍ॅप आणि त्यामधील सुविधा मोफत असल्याचं देखील सांगण्यात आले आहे. कोरोना संकट काळात लॉकडाऊनमुळे अनेकजण आपल्या घरी परतले. त्यामुळे त्यांच्या रोजंदारीवर, नोकर्‍यांवर गदा आली आहे. सुरूवातीला एकमेकांच्या मदतीने काळ सरला. पण आता जशी स्थिती निवळत आहे तशी उदरनिर्वाहासाठी अनेकांची पुन्हा कामाच्या शोधासाठी वणवण सुरू झाली आहे.