बॉलिवूड अभिनेता Sonu Sood देणार 1 लाख लोकांना नोकरी; 10 कोटी तरुणाचं भविष्य बदलवण्याचा केला दावा, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्लान

सोनू सूदने स्वत: सोशल मीडियावर एक लाख लोकांसाठी रोजगार देणार असल्याची पोस्ट शेअर केली आहे. सोनू सूदने या ट्विटमध्ये सांगितले आहे की, त्याने एक लाख लोकांच्या नोकरीची व्यवस्था केली आहे.

बॉलिवूड अभिनेता Sonu Sood देणार 1 लाख लोकांना नोकरी; 10 कोटी तरुणाचं भविष्य बदलवण्याचा केला दावा, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्लान
सोनू सूद गुड वर्कर अॅप (PC - Twitter)

जर आपण बेरोजगार असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) आपल्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आला आहे. सोनू सूद पुन्हा एकदा गरजूंसाठी मसीहा म्हणून येत आहे. सोनू सूदने स्वत: सोशल मीडियावर एक लाख लोकांसाठी रोजगार देणार असल्याची पोस्ट शेअर केली आहे. सोनू सूदने या ट्विटमध्ये सांगितले आहे की, त्याने एक लाख लोकांच्या नोकरीची व्यवस्था केली आहे. या योजनेतून येत्या 5 वर्षात सुमारे 10 कोटी लोकांचे भविष्य बदलणार असल्याचा दावादेखील सोनूने केला आहे.

रोजगारासाठी गुडवर्कर अ‍ॅप डाउनलोड करा -

सोनू सूद देशातील कोट्यवधी लोकांना नोकर्‍या देण्याची व्यवस्थाही करीत आहे. अशा लोकांसाठी सोनू सूद रोजगाराची नवी योजना घेऊन आला आहे. यासंदर्भात सोनूने ट्विटमध्ये माहिती दिली आहे. यात त्याने लिहिलं आहे की, 'नवीन वर्ष, नवीन अपेक्षा, नवीन नोकरीच्या संधी...आणि त्या संधी आपल्या जवळ आणा. प्रवासी रोजगार आता होतील गुडवर्कर. आजच गुडवर्कर अ‍ॅप डाउनलोड करा आणि चांगल्या उद्याची आशा करा.' (वाचा - Alia Bhatt First Look in RRR: बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट च्या वाढदिवसानिमित्त दिग्दर्शक SS Rajamouli ने शेअर केला Roudram Ranam Rudhiram चित्रपटातील अभिनेत्रीचा लूक)

दरम्यान, या ट्विटसह सोनूने या अ‍ॅपची लिंक शेअर केली असून काही मजेदार हॅशटॅगही लिहिले आहेत. या हॅशटॅगमध्ये अब इंडिया बनेगा कामयाब (#AbIndiaBanegaKaamyaab), गुड वर्कर (#GoodWorker), नौकरी पाना हुआ आसान (#NaukriPaanaHuaAasaan) हॅशटॅगचा समावेश आहे.

सोनू सूद च्या या ट्विटमुळे हजारो लाखो बेरोजगारांच्या चेहऱ्यावर आनंद आला आहे. या योजनेनंतर लोक सोनू सूदचे कौतुक आणि आभार मानत आहेत. सोनू सूद ने यापूर्वी असा दावा केला होता की, आतापर्यंत या अभियानाद्वारे 1 लाख 20 हजार 52 लोकांना नोकर्‍या देण्यात आल्या आहेत आणि आता 1 लाख लोकांसाठी तो पुन्हा नव्या संधी उपलब्ध करून देणार आहेत.

(The above story first appeared on LatestLY on Mar 15, 2021 05:03 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).