LIC  ग्राहकांसाठी खुशखबर! दोन वर्षांपासून बंद असलेली विमा पॉलिसी पुन्हा सुरु करता येणार
LIC | (File Photo)

भारतीय जीवन बीमा निगम अर्थाच एलआयसी (LIC) आपल्या ग्राहकांसाठी दिलासादायक योजना घेऊन आली आहे. या योजने अंतर्गत ग्राहकांना आता बंद पडलेली पॉलिसी (Lapsed Policy ) पुन्हा सुरु करता येणार आहे. विशेष करुन जे ग्राहक आपल्या पॉलिसीचा हाप्ता गेले दोन वर्षे भरु शकले नाहीत किंवा ज्यांची पॉलिसी लॅप्स्ड झाली आहे अशा ग्राहकांना आपली पॉलिसी (LIC Insurance Policy) पुन्हा सुरु करण्याची संधी एलआयसीने उपलब्ध करुन दिली आहे. भारतीय जीवन बीमा निगमने माहिती देताना म्हटले आहे की, ज्या पॉलिसी लॅप्स्ड होऊन दोनपेक्षा अधिक काळ झाला आहे असे ग्राहक आपली पॉलिसी पुन्हा नव्याने सुरु करु शकतात. या पॉलिसी पुन्हा सुरु करण्याची म्हणजेच रिवाइव करण्याची सुविधा या आधी उपलब्ध नव्हती. त्यामुळे अनेक ग्राहकांचे पैसे एलआयसीकडे अडकले होते. तसेच, अनेक ग्राहकांना इच्छा असूनही आपली पॉलिसी नियमीत करता येत नव्हती. मात्र, एलआयसीच्या नव्या नियमानुसार आता अशा पॉलिसी नव्याने सुरु करण्याचा ग्राहकांचा मार्ग मोकळा झाला आहे.

एलआयसीने नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार, IRDAI प्रोडक्‍ट रेगुलेशन 2013 अन्वये 1 जानेवारी 2014 पासून ज्या तारखेपासून ग्राहक प्रीमियम भरत नाहीत त्या तारखेपासून दोन वर्षांपर्यंतच्या कालावधीत ग्राहक आपली पॉलिसी केव्हाही सुरु करु शकतात. या आधी ज्या पॉलिसी दोन वर्षे कालावधीपेक्षा अधिक काळापासून बंद आहेत त्या पॉलिसी मात्र ग्राहकांना पुन्हा सुरु करता येणार नाहीत. (हेही वाचा, Airtel Digital TV, Dish TV, Tata Sky सह नव्या, जुन्या DTH ग्राहकांसाठी आता KYC करणं बंधनकारक; SMS द्वारा मिळणार चॅनल निवडीची सोय)

एलआयसीचे प्रबंध निदेशक विपिन आनंद यांनी माहिती देताना सांगितले की, अशी अनेक उदाहरणे पुढे आली आहेत की, काही पॉलिसीधारक हाप्त्याचे पैसे भरण्यास असक्षम राहिला आहे व त्या कारणामुळे त्याची पॉलिसी लॅप्स्ड झाली आहे. अशा ग्राहकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. कारण, नव्या नियमानुसार आता या ग्राहकांना जुन्या पॉलिसी पुन्हा नव्याने सुरु करता येणार आहेत. त्यामुळे अशा ग्राहकांना आपल्या जुन्या पॉलिसी सोडून नव्या पॉलिसी खरेदी करण्यापेक्षा आपल्या जुन्याच पॉलिसी पुन्हा नव्याने सुरु करता येणार आहेत.