टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी म्हणजेच TRAI च्या नव्या नियमांमध्ये बदल करून ग्राहकांच्या सोयीसाठी आता प्रक्रिया अधिक सुलभ करण्याचे प्रयत्न सुरू आहे. ट्रायच्या नव्या नियमांनुसार डीटीएच धारकांना आता केवायसी (KYC) करणं बंधनकारक केले आहे. 2019 च्या सुरूवातीला ट्राय कडून नवी नियमावली जाहीर करत वाहिन्यांचे दर नियमित करण्याचे प्रयत्न केले जात होते. मात्र तरीही अनेक ग्राहकांची हवी ती वाहिनी मिळत नसल्याची, चॅनल संबंधी तक्रार मोबाईल अॅप व वेबसाईटवर योग्य रित्याने सोडवली जात नसल्याच अनेकदा समोर आलं आहे. DTH युजर्ससाठी खुशखबर! लवकरच SMS च्या माध्यमातून चॅनल निवडता येणार.
TRAI च्या नव्या नियमांनुसार, डीटीएच ऑपरेटर्सना केवायसी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या नियमामुळे नव्या सोबतच जुन्या डीटीएच ग्राहकांनादेखील केवायसी करणं बंधनकारक असणार आहे. नव्याने सबस्क्रिप्शन घेताना ग्राहकांकडून ही केवायसी प्रक्रिया पूर्ण केली जाईल. तर जुन्या ग्राहकांमध्ये केवायसी करण्यासाठी 2 वर्षांचा अवधी देण्यात आला आहे.
डीटीएच धारकांना देण्यात आलेल्या नव्या सोयी सुविधेनुसार, आता एका टेक्स्ट मेसेजद्वारा देखील चॅनल सबस्क्राईब किंवा अनसबस्क्राईब करता येणार आहे. 999 या क्रमांकावर डीटीएच ग्राहकांना सर्व चॅनल्सची यादी पाहता येणार आहे. ट्रायने दिलेल्या आदेशानुसार, डीपीओ म्हणजेच डिस्ट्रीब्युशन प्लॅटफॉर्म्स ऑपरेटर्स यांना याविषयी अधिकार देण्यात आले आहेत. यामुळे आता डीटीएच धारकांना आपल्या पसंतीचे चॅनल निवडता येणार आहेत. तसेच प्रत्येक चॅनल साठी किती पैसे मोजावे लागणार याची माहिती देखील आता टेक्स्ट मेसेज द्वारा ग्राहकांना मिळणार आहे.