Gold Rate: तुम्हाला सोन्यात गुंतवणूक करायची असेल आणि त्याच्या किमतीवर लक्ष ठेवायचे असेल, तर तुमच्या मनात नक्कीच प्रश्न असेल की, येत्या काही दिवसांत सोन्यावर काय रिटर्न मिळेल? चला जाणून घेऊया याविषयी तज्ञांचे काय मत आहे. सोन्याची किंमत पुन्हा एकदा 52,000 च्या पुढे जाईल का? या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात.
कोरोना थर्ड वेव्हच्या भीतीमुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीचे पर्याय शोधत आहेत. शेअर बाजारातील सततची घसरणही हेच दर्शवत आहे. अशा स्थितीत सोन्यामधील गुंतवणुकीबाबत गुंतवणूकदारांचा कल बदलला असून गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात तेजी दिसून येत आहे. (वाचा - Gold-Silver Rate: सोने स्थिर पण चांदी कशी? राज्यातील प्रमुख शहरांतील भाव घ्या जाणून)
सोने 52,000 पार करणार?
सोन्याचा हा तेजीचा कल पाहता, गुंतवणूकदारांमध्ये त्याची किंमत झपाट्याने वाढण्याची अपेक्षा आहे. येत्या काही दिवसांत लग्नसराईचा हंगाम सुरू झाल्याने सोन्याची मागणीही वाढणार असून त्यामुळेही किंमत वाढू शकते.
मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसचे उपाध्यक्ष (कमोडिटी अँड करन्सी रिसर्च) नवनीत दमानी सांगतात की, बाजारातील सुधारणांमुळे सोन्याची खरेदी येत्या 12 ते 15 महिन्यांत वाढू शकते आणि त्यामुळे सोन्याची किंमत 2,000 डॉलर (सुमारे 1.48 लाख). रुपये) प्रति औंस नवीन उच्चांक गाठू शकते. एक औंस म्हणजे 28.34 ग्रॅम. त्यानुसार 10 ग्रॅम सोन्याची किंमत 52,500 रुपयांच्या वर जाऊ शकते.
2021 मध्ये सोन्याचा भाव -
2021 मध्ये सोन्याच्या किमतीत सुमारे 4% घट झाली होती. तो प्रति औंस $1806 (सुमारे 1.34 लाख रुपये) वर बंद झाला. सध्या भारतीय बाजारात सोन्याचा भाव 48,535 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. तर डॉलरमध्ये त्याची किंमत $1,840 (सुमारे 1.36 लाख रुपये) प्रति औंस आहे.