Gold-Silver Rate Today: सोने स्थिर पण चांदी कशी? राज्यातील प्रमुख शहरांतील भाव घ्या जाणून
आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातू (Precious Metals) सोने दर (Gold Price Today) आज काहीस्थिर अल्याचे पाहायला मिळत आहे. बावीस कॅरेट प्रति 10 ग्रॅम सोन्याची किंमत आज 47,090 रुपये पाहायला मिळत आहे. हिच किंमत पाठिमागील ट्रेडमध्ये 47,090 रुपये प्रति 10 ग्रॅम इतक्यात किमतीवर बंद झाली होती.
आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातू (Precious Metals) सोने दर (Gold Price Today) आज काहीस्थिर अल्याचे पाहायला मिळत आहे. बावीस कॅरेट प्रति 10 ग्रॅम सोन्याची किंमत आज 47,090 रुपये पाहायला मिळत आहे. हिच किंमत पाठिमागील ट्रेडमध्ये 47,090 रुपये प्रति 10 ग्रॅम इतक्यात किमतीवर बंद झाली होती. म्हणजेच सोने दरात आज विशेष बदल पहायला मिळत नाहीत. गुड रिटर्न्स ही वेबसाईट सोने, चांदी दरांबाबत माहिती देते. या वेबसाईटनुसार चांदी (Silver Price Today) आज प्रति किलो 61,700 रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे. अर्थात इथे दिलेले दर कोणतेही कर न लावता केवळ मूळ किमतीनुसार असतात. त्यात जीएसटी आणि विविध राज्यांचे स्थानिक दर यांनुसार बदल होऊ शकतात.
राज्यातील प्रमुख शहरांतील सोने चांदी दर
मुंबई-
22 कॅरेट: 47,90 रुपये (प्रति 10 ग्रॅम)
24 कॅरेट: 49,960 रुपये (प्रति 10 ग्रॅम)
पुणे-
22 कॅरेट:46,320 रुपये (प्रति 10 ग्रॅम)
24 कॅरेट: 48,840 रुपये (प्रति 10 ग्रॅम)
नागपूर-
22 कॅरेट:47,090 रुपये (प्रति 10 ग्रॅम)
24 कॅरेट: 49,090 रुपये (प्रति 10 ग्रॅम)
चांदी दर आज प्रती 10 ग्रॅम 617 रुपये आहे.
वर देण्यात आलेले सोने, चांदी दर हे केवळ सूचक आहेत. त्यात GST, TST यांसारख्या दरांचा समावेश नाही. सोने, चांदी यांचे मूळ दर वेगळे असतात. त्यात उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्क लागल्याने राज्य आणि प्रांतवार या दरांमध्ये तफावत आढळते. विविध राज्यांमध्ये उत्पादन शुल्क वेगवेगळे असल्याने राज्यनिहाय सोने, चांदी दरात फरक असू शकतो. कधी हा फरक अधिक असतो कधी कमी. त्यातच जर तुम्ही सोने, चांदी दागिणे खरेदी करत असाल तर त्यावर घडणावळ म्हणजे मेकींग चार्जेसही लागतात. त्यामुळे अचूक दरांसाठी आपण आपल्या स्थानिक सोनार अथवा ज्वेलर्सशी संपर्क साधू शकता. (हेही वाचा, Gold Quality and Purity: 22 कॅरेट, 23 आणि 24 Carat सोने म्हणजे काय? तिन्हीमध्ये नेमका फरक काय?)
दागिने बनविण्यासाठी प्रामुख्याने 22 कॅरेट सोन्याचाच वापर होतो. यात काही लोक 18 कॅरेट सोन्याचाही उपयोग करतात. सोने दागिने कॅरेट अनुसार हॉल मार्कचे बनतात. 24 कॅरेट सोन्याच्या दागिण्यांवर 999 असा शिक्का असतो. 23 कॅरेट दागिन्यावर 958, 22 कॅरेट दागिन्यावर 916, 21 कॅरेट वर 875 आणि 18 कॅरेट वर 750 लिहीलेले असते. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोशिएशन नुसार आपण केवळ एक मिस्ड कॉल देऊनही सोने, चांदी दर जाणून घेऊ शकता. त्यासाठी आपणास 8955664433 या क्रमांकावर एक मिसकॉल द्यावा लागेल.ज्या फोन नंबरवरुन आपण मिस कॉल द्याल त्याच क्रमांकावर आपल्याला हे दर उपलब्ध होऊ शकतील.
(The above story first appeared on LatestLY on Jan 19, 2022 10:59 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

