दिवाळखोरीमध्ये निघालेल्या गो फर्स्ट (Go First Airlines) एअरलाईन कडून आता रद्द झालेल्या फ्लाईट्सचे पैसे त्यांच्या ग्राहकांना परत देण्याच्या सूचना DGCA ने दिल्यानंतर रिफंडची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मागील 15 दिवसांपासून ऐनवेळेस फ्लाईट्स रद्द झाल्याने अनेक प्रवाशांचे हाल झाले आहेत. 3 मे पासून गो फर्स्टची फ्लाईट्स रद्द झाली आहेत. त्यामुळे बुकिंग केलेल्या तिकीटाची रक्कम पुन्हा ग्राहकांना कधी मिळणार याची प्रतिक्षा आहे. आता एअरलाईन्स कडून यावर तोडगा काढत रिफंड प्रक्रियेसाठी "Ease My Claims" लॉन्च केले आहे. त्याद्वारा ग्राहकांनी रिफंड घ्यावे असे एअरलाईनकडून सांगण्यात आले आहे. नक्की वाचा : Go First Crisis: गो फर्स्ट च्या दिवाळखोरीवर NCLT चं शिक्कामोर्तब; 19 मेपर्यंत उड्डाणं रद्द .
गो फर्स्टच्या रद्द झालेल्या तिकीटांचे कसे मिळवाल रिफंड?
- तिकीटाचे पैसे मिळवण्यासाठी gofirstclaims.in/claims वर क्लिक करा.
- त्यानंतर तुम्हांला विचारली जाणारी माहिती भरा.
- त्यानंतर गो फर्स्ट कधी आणि कोणत्या मार्गाने रिफंड मिळेल याची माहिती दिली जाईल.
रिफंड फाईल करण्यासाठी तुम्हांला एक अकाऊंट बनवणं गरजेचं आहे. त्यासाठी तुमचं नाव, ईमेल आयडी, मोबाईल नंबर, युजर आयडी, पासवर्ड द्यावा लागणार आहे. त्यानंतर कंपनीचं नाव सिलेक्ट करा. तुमचा रिलेव्हंट फॉर्म सिलेक्ट करा. त्यानंतर प्रायव्हसी पॉलिसी आणि अटी- नियम स्वीकारा. त्यानंतर साईन अप बटण वर क्लिक करा.
क्लेम फॉर्म भरताना तुम्हांला एक सपोर्टिंग डॉक्युमेंत देखील द्यावं लागणार आहे. मात्र त्याची साईझ 500 केबी पेक्षा जास्त नसावी हे देखील लक्षात ठेवा.
गो फर्स्टच्या कोणत्याही बाबीबद्दल तुम्हांला काही अडत असेल तर 1800 2100 999 या टोल फ्री नंबर कॉल करा किंवा feedback@flygofirst.com या इमेल आयडी वर तुमची समस्या मेल करा.