Go First | Twitter

गो फर्स्ट (Go First) ही विमानसेवा कंपनी दिवाळखोरीत निघाल्याचं आता पक्कं झालं आहे. गो फर्स्टची दिवाळखोरी याचिका एनसीएलटीने (National Company Law Tribunal) स्वीकारली आहे. 4 मे दिवशी यावरील निर्णय राखून ठेवण्यात आला होता. पण आता एनसीएलटी कडून मोरेटोरियमची मागणी मान्य केली आहे. आता कर्जाशी संबंधित प्रकरणामध्ये प्रलंबित असलेली कोणतीही कायदेशीर कार्यवाही रखडलेली मानली जाणार आहे. कर्जदार कोणत्याही कर्जाच्या बाबतीत कायदेशीर कारवाई देखील करू शकत नाहीत. न्यायाधिकरणाच्या आदेशानुसार कोणत्याही कर्मचाऱ्याची कपात केली जाणार नाही.

अध्यक्ष न्यायमूर्ती रामलिंगम सुधाकर आणि एल एन गुप्ता यांच्या दोन सदस्यीय खंडपीठाने कर्जबाजारी कंपनी चालवण्यासाठी अभिलाश लाल यांची अंतरिम रिझोल्यूशन प्रोफेशनल (IRP) म्हणून नियुक्ती केली आहे. गो फर्स्टच्या बोर्डालाही नियमित खर्चासाठी 5 कोटी रुपये जमा करावे लागणार आहेत. नक्की वाचा: विमान कंपनी Go First ला तात्काळ प्रभावाने आणि पुढील आदेश येईपर्यंत तिकिटांचे बुकिंग आणि विक्री थांबविण्याचे निर्देश; DGCA ची कारवाई .

पहा ट्वीट

गो फर्स्ट ने 3 मे पासून उड्डाणं थांबवली आहेत. आता 19 मे पर्यंत स्थगिती वाढवण्यात आली आहे. गो फर्स्टच्या वेबसाइटनुसार, एअरलाइनने एकेकाळी 27 देशांतर्गत आणि 8 आंतरराष्ट्रीय ठिकाणांसाठी दररोज 200 पेक्षा जास्त उड्डाणे चालवली आहेत पण आता गो फर्स्टकडे इंधन भरण्यासाठीही पैसे नाहीत.