LPG Gas Cylinder Price 1 January 2024: दिलासादायक! नवीन वर्षात गॅस सिलेंडर झाला स्वस्त; जाणून घ्या तुमच्या शहरातील किंमत
LPG-Cylinder (फोटो सौजन्य -Wikimedia Commons)

LPG Gas Cylinder Latest Price: आजपासून 2024 वर्ष सुरू झाले आहे. सिलिंडरची किंमत (LPG Gas Cylinder Price) महिन्याच्या पहिल्या तारखेला अपडेट केली जाते. नवीन वर्षात सिलिंडरचे दर कमी होतील, अशी अपेक्षा होती. इंडियन ऑइलने व्यावसायिक सिलिंडरच्या किमती कमी केल्या आहेत. तेल विपणन कंपन्यांनी देशभरातील एलपीजी सिलिंडरच्या किमती अपडेट (LPG Gas Cylinder Price Update) केल्या आहेत. व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत किरकोळ बदल करण्यात आले आहेत. घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीतील कपात ही एक प्रकारे नवीन वर्षाची भेट आहे.

राजधानी दिल्लीत 19 किलोच्या सिलेंडरची किंमत 1755.50 रुपये आहे, तर कोलकातामध्ये व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1869.00 रुपये आहे. आज देशभरात व्यावसायिक सिलिंडरची किंमत केवळ 1.50 रुपयांनी कमी झाली आहे. आज मुंबईत 1708.50 रुपयांना व्यावसायिक सिलिंडर उपलब्ध होणार आहे. तर, चेन्नईमध्ये ते 1924.50 रुपयांना उपलब्ध असेल. (हेही वाचा - Rule Changes From 1 January 2024: जानेवारीपासून DA, ITR, महागड्या गाड्यांपासून स्वस्त सिलिंडरपर्यंत पैशांशी संबंधित 'हे' नियम बदलणार)

घरगुती सिलेंडरच्या किंमती -

घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दिल्लीत 903 रुपयांना सिलिंडर उपलब्ध आहे. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, सिलिंडरच्या किंमतीतील शेवटची कपात 30 ऑगस्ट 2023 रोजी झाली आहे.  (हेही वाचा - DA Hike Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार मोठ गिफ्ट; नवीन वर्षात महागाई भत्ता होणार निश्चित)

दरम्यान, तेल कंपन्यांनी विमान इंधनाच्या किमतीही कमी केल्या आहेत. प्रति किलो लिटर दरात सुमारे 4,162.50 रुपयांची घट झाली आहे. ही सलग तिसरी कपात आहे, यामुळे हवाई भाडे कमी होण्याची अपेक्षा आहे.