भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील मोठ्या बॅंकपैकी एक बॅंक म्हणजे सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया (Central Bank Of India). सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाच्या खातेदारांसाठी आनंदाची बातमी आहे. आता गुंतवणूकदारांना सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाच्या मुदत ठेवीवर (Fixed Deposit) अधिक लाभ मिळणार आहे. सेंट्रल बँकेने आपल्या ठराविक एफडीवरील व्याजदर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाच्या वेबसाइटवर (Website) उपलब्ध असलेल्या माहितीनुसार नवीन दर आजपासून, म्हणजे 10 जुलै 2022 पासून लागू होतील. तसेच सार्वजनिक बँक, इंडियन ओव्हरसीज बँकेने दोन कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. बँकेच्या वेबसाइटनुसार वाढलेले व्याजदर 12 जुलै 2022 पासून लागू होतील.
सेंट्रल बँक ऑफ इंडिया एफडीचे नवे दर :-
1. 15-30 दिवसांत परिपक्व होणाऱ्या एफडीवरील व्याज दर 2.90 टक्के
2. 7 ते 14 दिवसांत मुदतपूर्ती होणाऱ्या ठेवींवर 2.75 टक्के
3. 46-90 दिवसांत परिपक्व होणाऱ्या एफडीवरील व्याजदर 3.35 टक्के
4. 31 ते 45 दिवसांत परिपक्व होणाऱ्या ठेवींवर व्याजदर 3 टक्के
5. 91 ते 179 दिवसांत मुदतपूर्ती होणाऱ्या ठेवींवर 3.85 टक्के
6. 180 ते 364 दिवसांच्या मुदतीच्या एफडीवर 4.40 टक्के
7. 1 वर्ष आणि 2 वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या एफडीवर आता 5.25 टक्के
(हे ही वाचा :-Bank FD Rate Hike: 'या' बँकांच्या ग्राहकांसाठी खूशखबर! FD आणि Savings Bank Account वर मिळणार अधिक व्याज)
सेंट्रल बँक ऑफ इंडिया ची स्थापना १९११ मध्ये झाली. देशभरात या बॅंकेच्या ४,५९४ शाखा असुन ही नॅशनल बँक आहे. २८ भारतीय राज्यांसह देशातील ७ केंद्रशासित प्रदेशांमध्ये या बॅकेचे नेटवर्क आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांची संख्या कोटींच्या घरात आहे. तरी सेंट्रल बँक ऑफ इंडिया कायमच आपल्या ग्राहकांना फायदा होणाऱ्या नवनवीन योजना आणताना दिसतात.