Aadhaar Card प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Facebook//UIDAI)

Aadhaar Card Free Update: आधार कार्ड (Aadhaar Card) धारकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. आधार कार्ड युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया किंवा UIDAI ने मोफत आधार कार्ड अपडेट (Aadhaar Card Free Update) करण्याची मुदत वाढवली आहे. आता तुम्ही 14 डिसेंबर 2024 पर्यंत आधार अपडेट करू शकता. यापूर्वी आधार अपडेटची अंतिम तारीख 14 सप्टेंबर 2024 होती. परंतु, अंतिम मुदतीनंतर आधार अपडेट केल्यानंतर तुम्हाला शुल्क भरावे लागेल.

तथापी, जर तुमचे आधार कार्ड 5 किंवा 10 वर्षे जुने असेल आणि तुम्ही ते एकदाही अपडेट केले नसेल, तर तुम्ही आता डिसेंबर 2024 पर्यंत मोफत आधार अपडेट करू शकता. युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने त्याची अंतिम तारीख 14 सप्टेंबर 2024 निश्चित केली होती, परंतु आता ती तीन महिन्यांनी वाढवून 14 डिसेंबर 2024 करण्यात आली आहे. UIDAI ने ही माहिती सोशल मीडियावर शेअर केली असून ती X हँडलवर पोस्ट केली आहे. (हेही वाचा - How To Update Aadhaar: आधार अपडेट करा, दंड टाळा; जाणून घ्या पुनर्प्रमाणीकरण प्रक्रिया)

आधार कार्ड अपडेट करण्यासाठी 'ही' कागदपत्रे आवश्यक -

  • आधार कार्ड अपडेट करण्यासाठी ग्राहकांना त्यांचा डेमोग्राफिक डेटा, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल नंबर इत्यादी माहिती द्यावी लागेल.
  • आधार अपडेटसाठी नाव, जन्मतारीख, निवासी प्रमाणपत्र किंवा इतर विहित ओळख पुरावा ऑनलाइन अपलोड करावा लागेल.
  • यासाठी तुम्हाला आधार ॲप डाउनलोड करून किंवा आधार वेबसाइटला भेट देऊन तुमचे आधार अपडेट करावे लागेल. तथापि, आधार अपडेट करण्यासाठी, तुम्हाला वेबसाइटवर विचारलेली संपूर्ण माहिती भरावी लागेल आणि मूळ कागदपत्राचा फोटो देखील द्यावा लागेल.

आधार अपडेट कसे करावे?

  • सर्वप्रथम तुम्हाला https://myaadhaar.uidai.gov.in/ ला भेट द्यावी लागेल. यानंतर तुम्हाला आधार क्रमांकाने लॉगिन करावे लागेल.
  • तुम्हाला 'पत्ता अपडेट करण्यासाठी पुढे जा' पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर वन-टाइम पासवर्ड (OTP) पाठवला जाईल.
  • यानंतर तुम्हाला ‘डॉक्युमेंट अपडेट’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल. यानंतर तुम्हाला तपशील दिसेल.
  • हा तपशील सत्यापित करणे आवश्यक आहे आणि नंतर लागू हायपरलिंक वर क्लिक करा.
  • अपडेट रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर, तुम्हाला 14 अंकी URN नंबर मिळेल, जो सेव्ह आणि चेक केला जाऊ शकतो.
  • पत्ता अपडेट करण्यासाठी, तुम्हाला 'आधार अपडेट करा' हा ऑनलाइन पर्याय निवडावा लागेल, त्यानंतर तुम्हाला 'पत्ता' पर्याय निवडावा लागेल.
  • आधार अपडेट करण्यासाठी तुम्हाला Proceed वर क्लिक करावे लागेल. यानंतर, कागदपत्राची स्कॅन कॉपी आणि फिंगरप्रिंट आणि आयरिश स्कॅन माहिती प्रविष्ट करावी लागेल.

आधार कार्डमधील जन्मतारीख नावनोंदणीच्या वेळी प्रविष्ट केलेल्या जन्मतारखेपासून जास्तीत जास्त तीन वर्षांनी फक्त एकदाच अपडेट केली जाऊ शकते. याशिवाय, आधार कार्डवरील लिंग तपशील देखील एकदाच अपडेट केला जाऊ शकतो.